वाघाचे तीन तुकडे करून जंगलात फेकले, शिकार की झुंज…

0
254
file photo

भंडारा : तुमसर तालुक्यातील तुमसर वनपरिक्षेत्रांतर्गत येत असलेल्या झंजेरिया गावाजवळील घनदाट जंगलात एक वाघ मृत अवस्थेत आढळून आला, विशेष म्हणजे त्याच्या मृतदेहाचे तीन तुकडे आढळल्याने एकच खळबळ उडाली असून मृत वाघाचे तुकडे करून जंगलात कुणी फेकले, या दिशेने शोध सुरू झाला आहे.

ही घटना आज सकाळी ९ वाजताच्या सुमारास उघडकीस आली. विशेष म्हणजे, मृतावस्थेत आढळलेला वाघ तीन तुकड्यात दिसून आला. पंधरा दिवसातील वाघ मृत आढळल्याची दुसरी घटना आहे. ही शिकार की वाघाच्या झुंजीत मृत्यू झाला याचा वन विभागाकडून शोध सुरू आहे.तुमसर वन परिक्षेत्रात मागील काही दिवसांपूर्वी वाघाचे दर्शन झाल्याने येथील भागात राहणाऱ्या नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. ८ दिवसांपूर्वी तुमसर येथे एक वाघ मृतावस्थेत आढळून आला होता. त्यानंतर आज सकाळी एका वाघाचे दोन तुकडे करुन त्याची शिकार केल्याची धक्कादायक बाब उघडकीस आली आहे. याबाबत माहिती मिळताच वन विभागाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.