संत तुकाराम महाराजांचे वंशज शिरीष महाराज मोरे यांनी गळफास घेत संपवले जीवन

0
11

पुणे:-संत तुकाराम महाराजांचे ११ वे वंशज, प्रसिध्द व्याख्याते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे प्रचारक हभप शिरीष महाराज मोरे (वय-३०) यांनी आज सकाळी राहत्या घरात आपलं जीवन संपवलं आहे. घरामध्ये गळफास घेत त्यांनी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

या घटनेने परिसरात आणि वारकरी सांप्रदायात एकच खळबळ उडाली आहे. देहू परिसरामध्ये शोककळा पसरली आहे. आत्महत्येचे कारण समोर आलं आहे. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता. त्यांचा नुकताच त्यांचा विवाह ठरला होता. शिवव्याख्याते म्हणून मोरे यांचा मोठा नावलौकीक होता. शिरीष महाराज हे 30 वर्षांचे होते. त्यांनी आत्महत्या का केली हे अद्याप कळू शकलेले नाहीये. पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून अधिक चौकशी करत आहेत. मात्र, हभप शिरीष महाराज यांच्या आत्महत्येनंतर तीर्थक्षेत्र देहू गावावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. नागरिकांकडून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

बुधवारी सकाळी 8.30 च्या सुमारास त्यांनी आत्महत्या केली आहे. राहत्या घरात गळफास घेऊन त्यांनी जीवन संपवले आहे. पोलिसांच्या अंदाजानुसार, आर्थिक विंवचनेतून त्यांनी आत्महत्या केली असावी असा तर्क वर्तवण्यात येत आहे. आत्महत्येपूर्वी त्यांनी चिठ्ठीदेखील लिहून ठेवली होती. मिळालेल्या माहितीनुसार, शिरीष महाराज यांचा काही दिवसांपूर्वी साखरपुडा झाला होता. घरात आनंदाचे वातावरण होते. तर एप्रिल महिन्यात त्यांचा विवाह होणार होता. मात्र त्यापूर्वीच त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलले आहे. आर्थिक विंवचना हेच आत्महत्येमागचे कारण असू शकते, असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. शिरीष महाराज यांच्या जाण्याने त्यांच्या कुटुंबीयांना मोठा धक्का बसला आहे.