चंद्रपूर- जिल्ह्यातील मांगली गावानंतर आता नागपूर शहरातही बर्ड फ्लू (Bird Flu) ची लागण झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे. शहराच्या मध्यवर्ती भागात बर्ड फ्लू आढळून आल्यामुळे प्रशासनात मात्र खळबळ उडाली आहे. कालपासून विदर्भातील चंद्रपूर आणि नागपूर (Nagpur) या दोन जिल्ह्यांमध्ये बर्ड फ्लू चे प्रकरण समोर आले होते. त्यामुळे त्या अनुषंगाने प्रशासन सतर्क झाले आहे.
पुढे आलेल्या माहितीनुसार, नागपूरच्या ताजबाग परिसरात एका व्यक्तीच्या घरातील तीन कोंबड्याचा 31 जानेवारीनंतर अचानक मृत्यू झाल्याची घटना घडली होती. या मृत्यूची माहिती पशु संवर्धन विभागाकडे दिली असता पशु संवर्धन विभागाकडून या प्रकारणाची तपासणी केली. दरम्यान या तपासणीनंतर भोपाळच्या ‘राष्ट्रीय उच्च सुरक्षा पशु रोग प्रयोगशाळे’च्या अहवालात कोंबड्यांचे मृत्यू बर्ड फ्लूमुळे झाल्याचे पॉसिटीव्ह रिपोर्ट आले आहे. परिणामी, पशुसंवर्धन विभागाकडून ताजबाग परिसरातील एक किलोमीटरच्या परिसरात प्रतिबंधनात्मक उपाययोजना करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.