ग्रारपीटग्रस्तांना मदत जाहीर

0
9

नागपूर-गारपीटग्रस्तांना सरकारी नियमाप्रमाणेच आर्थिक मदत करण्यात येणार असल्याची घोषणा महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी मंगळवारी विधान परिषदेत केली. उत्तर महाराष्ट्रातील गारपीटग्रस्तांसाठी वाढीव आर्थिक मदत देण्याची मागणी विरोधकांनी विधीमंडळात केली होती. मात्र, मदतीत कोणतीच वाढ करण्यात आलेली नसल्याचे स्पष्ट झाल्यावर कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या सदस्यांनी विधान परिषदेतून सभात्याग केला.
एकनाथ खडसे यांनी गारपीटग्रस्त शेतकऱयांसाठी जाहीर केलेली मदत पुढील प्रमाणे…
कोरडवाहू शेतीसाठी प्रतिहेक्टरी १० हजार रुपये
बागायती शेतीसाठी प्रतिहेक्टरी १५ हजार रुपये
फळबागांसाठी प्रतिहेक्टरी हेक्टरी २५ हजार रुपये
जमीन वाहून गेल्या प्रतिहेक्टरी २५ हजार रुपये
गारपीटग्रस्त शेतकऱय़ांचे तीन महिन्यांचे वीजबिल माफ
शेतकऱयांचे कच्चे घर पडल्यास २५ हजार रुपये
शेतकऱयांचे पक्के घर पडल्यास ७० हजार रुपये
घराचे अंशतः नुकसान झाल्यास १५ हजार रुपये