40.6 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News पिंडदानाकरीता कोरणी घाटावर गेलेल्या ३ महिला बुडाल्या

पिंडदानाकरीता कोरणी घाटावर गेलेल्या ३ महिला बुडाल्या

0
822

blank

गोंदिया,दि.०८ः तालुक्यातील कोरणी घाट रजेगाव येथे बाघ नदीच्या पात्रात आज दि.8 जून रोजी मुलाचे पिंडदान करण्यासाठी नागपूरवरुन आलेल्या 3 महिला बुडल्याची घटना समोर आली आहे.सदर महिला या नदीपात्रात पिंडदानाकरीता उतरल्या असता त्यांचा तोल ढासळल्याने त्या नदीपात्रात पडल्या,यात त्यांचा बुडून मृत्यू झाला.सदर घटनेची माहिती आपत्ती निवारण नियंत्रण कक्षाला मिळताच पोलीस पथक व बचाव पथक पाठविण्यात आले.शोधमोहिमेनंतर बुडालेल्या तिन्ही महिलांचे मृतदेह बाहेर काढण्यात आले आहे.त्यामध्ये समीता शत्रुग्न टेंभरे(३२) यांचे पाय घसरल्याने त्या नदीत बुडायला लागल्याने त्यांना वाचविण्याकरीता गेलेल्या मीनाक्षी बघेले( वय ३६) व मीराबाई इसुलाल तुरकर(वय ५५)सर्व.रा.नागपूर यांचा कोरणी घाट येथील बाघनदीत बुडून मृत्यू झाला.रावणवाडी पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून मृतदेह उत्तरीय तपासणीकरीता जिल्हा रुग्णालय व वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आले आहे.पुढील तपास ठाणेदार वैभव पवार यांच्या मार्गदर्शनात सुरु आहे.

blank