24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home Top News बाम्हणी येथे जैवखत उत्पादन तंत्रज्ञानावर प्रदर्शनाचे आयोजन

बाम्हणी येथे जैवखत उत्पादन तंत्रज्ञानावर प्रदर्शनाचे आयोजन

0
68

गोंदिया,दि.०९- पंजाबराव देशमुख कृषिविद्यापीठ संलग्न हिराटोलाच्या मनोहरभाई पटेल कृषि महाविद्यालयाच्या वतीने आमगाव तालुक्यातील बाम्हणी येथे जैवखत उत्पादन तंत्रज्ञानावर आधारित प्रदर्शनाचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते.
सदर प्रदर्शन महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. एस सी अवताडे, एम सी भगत, एस पी उराडे आणि के आर चव्हाण या शिक्षकवृंदांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.
या प्रदर्शनामध्ये समावेश असलेल्या महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी उपस्थित शेतकऱ्यांचे आधुनिक शेती आणि तंत्रज्ञान या विषयावर सखोल मार्गदर्शन केले. यावेळी नैसर्गिक खतांचा वापर, मातीची संरचना आणि सुधारणा याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रदर्शनादरम्यान, विद्यार्थ्यांनी शेतकऱ्यांना अझोला या नैसर्गिक जैवखताविषयी मार्गदर्शन करताना त्याचे फायदे समजावून सांगितले. अझोलामुळे हवेतील नायट्रोजन, वनस्पतीच्या वाढीसाठी आवश्यक असलेले नियंत्रक कसे मिसळले जाते आणि गवताची होणारी वाढ कशी रोखता येते, यावर उपस्थित शेतकऱ्यांचे सखोल मार्गदर्शन केले.
या प्रदर्शनामध्ये महाविद्यालयातील सृष्टी भदाडे, सुहानी भुसारी, वैदेही भरणे, विशाखा आंबेडारे आणि तेजस्विनी बिसेन या विद्यार्थिनींनी आपला सहभाग नोंदविला होता.

blank