24.4 C
Gondiā
Sunday, August 9, 2026
Home Top News निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील १२ राज्यांमध्ये होणार ‘एसआयआर’

निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय! बिहारनंतर आता देशातील १२ राज्यांमध्ये होणार ‘एसआयआर’

0
88

नवी दिल्ली दि. २७ :- आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भारतीय निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला. देशभरातील 12 राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये मतदारांच्या यादीच्या विशेष सुधारणा मोहिमेचा (Special Intensive Revision – SIR) दुसरा टप्पा लवकरच राबवला जाणार असल्याची घोषणा आयोगाने सोमवारी (27 ऑक्टोबर) केली.

वी दिल्लीत आयोजित विशेष पत्रकार परिषदेत मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी ही माहिती दिली. बिहारमधील ‘एसआयआर’ मोहीम यशस्वी झाल्यानंतर आयोगाने 36 राज्य निवडणूक आयुक्तांशी चर्चा करुन हा निर्णय घेतला.

पुढील वर्षी निवडणुका असलेल्या राज्यांवर लक्ष

पुढील वर्षी ज्या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुका होणार आहेत, त्या राज्यांमध्ये ही मोहीम महत्त्वाची ठरणार आहे. यात प्रामुख्याने तमिळनाडू, पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि पुद्दुचेरी या राज्यांचा समावेश आहे. यापूर्वी, 6 ऑक्टोबर रोजी मुख्य निवडणूक आयुक्तांनी संपूर्ण देशभरात मतदार याद्यांच्या सुधारणेची घोषणा केली होती.

दरम्यान, निवडणुक आयोगाने ज्या 12 राज्यांची यादी प्रसिद्ध केली आहे त्या यादीत महाराष्ट्राचे नाव नाही. म्हणजेच या दुसऱ्या टप्प्याता महाराष्ट्रात SIR होणार नाही हे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील निवडणुका होणार हे निश्चित मानले जात आहे.

‘एसआयआर’ मोहीम म्हणजे काय?

‘एसआयआर’ (SIR) ही निवडणूक आयोगाने राबवलेली एक व्यापक मतदार यादी अद्ययावत करण्याची प्रक्रिया आहे. याचा मुख्य उद्देश, घर-घरात जाऊन पडताळणी करणे आणि एक नवीन व अचूक मतदार यादी तयार करणे आहे. या प्रक्रियेद्वारे, केवळ पात्र नागरिक मतदार यादीत समाविष्ट केले जावेत, याची खात्री केली जाते आणि त्याचबरोबर डुप्लिकेट, मृत आणि अपात्र लोकांची नावे यादीतून वगळली जातात. या मोहिमेला ‘विशेष’ म्हटले जाते, कारण ती सामान्य वेळापत्रकाबाहेर आयोजित केली जाते. या मोहिमेत दारोदारी जाऊन पडताळणी, क्षेत्रीय तपासणी आणि अनेक नोंदींची क्रॉस-चेकिंग केली जाते.

blank