; संपूर्ण विमान जळून खाक;
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाला अपघात; बारामतीत लँडिंगदरम्यान झाला अपघात;
डीजीसीएची दिली माहिती
पवार कुटुंबीय बारामतीकडे रवाना
महाराष्ट्रावर शोककळा
पुणे:-राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा बारामतीतील भीषण विमान अपघातात दुर्दैवी मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यात शोककळा पसरली असून सगळ्याच क्षेत्रात हळहळ व्यक्त केली जात आहे. अजित पवार हे ६६ वर्षांचे होते. राज्याच्या राजकारणात मागील ४० वर्षांपासून अजित पवार यांचा वावर होता. धडाकेबाज निर्णय घेण्याची क्षमता, रोखठोक भाष्य यामुळे अजित पवार चर्चेत राहिले होते.अजिततदादांच्या निधनाने राज्याच्या राजकारणात मोठी पोकळी निर्माण झाली आहे.
नेमकं काय घडलं, प्रत्यक्षदर्शीने सांगितलं- (How did Ajit Pawar plane crash happen?)
अजित पवारांच्या विमानाचा अपघात झाला त्याठिकाणचे प्रत्यक्षदर्शीने धक्कादायक माहिती दिली आहे. पहिल्यांदा विमान वरुन गेलं, त्यानंतर गावातून खालून विमान येत होतं. नंतर विमान फिरलं आणि खाली जमीनीला लागलं, तेव्हा मोठा स्फोट झाला. स्फोट झाल्यानंतर आमच्या घरापर्यंत विमानाचे तुकडे उडाले. विमान जागेवर फिरलं आणि लगेच स्फोट झाला, असं एका महिला प्रत्यक्षदर्शीने सांगितलं.
विमानात कोण कोण होते? (Ajit Pawar Dead Baramati Plane Crash)
-
- अजित पवार
- विदीप जाधव
- पिंकी माळी
- कॅप्टन सुमित कपूर
- कॅप्टन शांभवी पाठक
विमान लाँडिंग होत असतानाच अपघात (Baramati Plane Crash)
राज्यामध्ये पंचायत समित्या आणि जिल्हा परिषद निवडणुकीसाठी रणधुमाळी सुरू आहे. आज अजित पवार यांचा बारामती दौरा होता. या बारामती दौऱ्यासाठी आज सकाळी बारामतीसाठी त्यांनी प्रस्थान केलं होतं. बारामतीमध्ये विमान लाँडिंग होत असतानाच विमानामध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने अपघातग्रस्त झाले. विमानामध्ये अजित पवार यांच्यासह पाच जण होते. त्या सर्वाचा मृत्यू झाला.
दादा पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त (Ajit Pawar Baramati Plane Crash)
अत्यंत गंभीर अवस्थेमध्ये अजित पवारांसह जखमींना बारामतीमध्येच उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. त्यामुळे अजित पवार यांच्या ‘दादा’ पर्वाच्या राजकारणाचा अकाली अस्त झाला आहे. राज्याच्या राजकारणामध्ये गेल्या साडेचार दशकांपासून अजित पवार हे गारुड सातत्याने महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सर्वाधिक चर्चिलं गेलं आहे. त्यांची धडाडी, राष्ट्रवादीचे एकहाती नेतृत्व आणि शरद पवारांचे वारसदार म्हणून अजित पवार यांच्याकडे सातत्याने पाहिलं जात होतं. मात्र, अजित पवार यांच्या अकाली जाण्याने पवार कुटुंबीयांसह अवघ्या राज्याला मुळापासून हादरा बसला आहे.
साडे चार दशकांपासून राजकारणात
अजित पवार यांचे मूळ गाव <-type=”interlinkingkeywords”>पुणे जिल्ह्यातील बारामती तालुक्यातील काटेवाडी आहे. मात्र त्यांचा जन्म अहमदनगर जिल्ह्यातील राहुरी तालुक्यातील देवळाली (प्रवरा) या त्यांच्या आजोळच्या गावी झाला. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण तेथेच झाले. महाविद्यालयीन शिक्षणासाठी अजित पवार मुंबईत आले, शिक्षण पूर्ण करून बारामतीला आले आणि तेथील सहकारी संस्थांमधून त्यांनी सामाजिक व राजकीय कार्याला सुरुवात केली. अजित पवार यांनी 1982 साली राजकारणात प्रवेश केला. त्याचवर्षी सहकारी साखर कारखान्याच्या संचालक मंडळावर त्यांची निवड झाली. तेव्हापासून ते अखेरचा श्वास घेण्यापर्यंत ते राजकारणात सक्रिय राहिले. अजित पवार यांनी 1991 पासून बारामती विधानसभा मतदारसंघाचे प्रतिनिधित्व करत आहेत.




