राज्यभरात थंडीची लाट!

0
16

पुणे-उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरडय़ा वाऱ्यांमुळे राज्याला हुडहुडी भरली असून, किमान तापमानात लक्षणीय घट झाली आहे. यवतमाळ येथे राज्यातील नीचांकी ६.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. शनिवापर्यंत कमी-अधिक प्रमाणात अशीच स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे. राज्याच्या अनेक भागात सध्या या हंगामातील नीचांकी तापमानाची नोंद झाली.
परभणी ३.६ अंश?
हवामान विभागाच्या नोंदींनुसार परभणी येथे ८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. मात्र, परभणी कृषी विद्यापीठाच्या नोंदीनुसार विद्यापीठाच्या आवारात ३.६ अंशांचे तापमान होते.
इतकी थंडी कशामुळे
राज्यात गेले दोन दिवस ढगाळ वातावरण होते. हे ढग अतिउंचावरील असल्याने त्यांच्यामुळे वातावरणातील ऊब वाढली नाही, उलट या ढगांनी सूर्यप्रकाश अडवून धरल्याने तापमान वाढले नाही. दुसरी बाब म्हणजे, सध्या उत्तरेकडून कोरडे व थंड वारे येत आहेत. त्यांच्यामुळे तापमानात आणखी घट झाली.
मध्य महाराष्ट्र
पुणे ९.१, नगर ८.१, जळगाव ८.४, मालेगाव ८.५, नाशिक ७, सातारा ११.९, सांगली १३.६, सोलापूर ११.९, कोल्हापूर १५, महाबळेश्वर १०.६
मराठवाडा
उस्मानाबाद ८.४, औरंगाबाद ९.८, परभणी ८, नांदेड १०
विदर्भ
यवतमाळ ६.२, गोंदिया ६.८, अकोला ७.५, नागपूर ६.८, वर्धा ८.८, बुलडाणा ९.२, ब्रह्मपुरी ९.९, चंद्रपूर १०.२, वाशिम १२
कोकण
मुंबई (कुलाबा) २१.२, मुंबई (सांताक्रुझ) १९.२, अलिबाग १६.५, रत्नागिरी १९.१, डहाणू १६.४, भीरा १८.५