२४१ प्रकल्पांना पर्यावरण मंजूरी

0
14

नवी दिल्ली- केंद्रात सत्तेत आल्यापासून नरेंद्र मोदी सरकारने देशातील २४१ प्रकल्पांना पर्यावरण विषयक मंजूरी दिली आहे. विशेष म्हणजे केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने मंजूरी दिलेल्या २४१पैकी सर्वाधिक प्रकल्प हे गुजरातमधील आहेत. त्यानंतर आंध्र प्रदेश आणि महाराष्ट्राचा क्रमांक लागतो.
गेल्या काही वर्षापासून पर्यावरण मंजूरी न मिळाल्यामुळे अनेक प्रकल्प रखडले होते. भाजप सरकार सत्तेत आल्यानंतर मे ते नोव्हेंबर २०१४ या काळात २४१ प्रकल्पांना हिरवा कंदील दिल्याचे केंद्रीय पर्यावरण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी राज्य सभेत सांगितले.
मात्र मंजूर करण्यात आलेल्या प्रकल्पांच्या आकडेवारीकडे लक्ष दिल्यास केंद्र सरकराने गुजरातला पुन्हा एकदा झुकते माप दिल्याचे दिसते. या २४१ पैकी सर्वाधिक गुजरातमधील ५५ प्रकल्पांना मंजूरी दिल्याचे दिसून येते. त्यानंतर आंध्र प्रदेशमधील ३५ तर महाराष्ट्रातील २२ प्रकल्पांना मंजूरी दिल्याचे जावडेकर म्हणाले.
तर मध्य प्रदेशमधील १८ प्रकल्पांना मंजूरी दिल्याचे ते म्हणाले.