23.2 C
Gondiā
Thursday, August 20, 2026
Home Top News बस अपघातात 19 प्रवाशांचा मृत्यू, 30 जखमी

बस अपघातात 19 प्रवाशांचा मृत्यू, 30 जखमी

0
25

वृत्तसंस्था

काश्मीर, दि. 20 – प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसचा अपघात होऊन 19 जणांचा मृत्यू झाला आहे. रेआसी जिल्ह्यात हा अपघात झाला आहे. ही बस रेआसी येथून बकाल गावाच्या दिशेने जात होती. गुरनाक परिसरात बसने रस्ता सोडला आणि खड्ड्यात जाऊन कोसळली. अपघातात 19 प्रवाशांचा मृत्यू झाला असून 30 जण जखमी झाले आहेत. जखमींना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. काही जण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे.