33.9 C
Gondiā
Sunday, June 7, 2026
Home Top News रमाई समूहात महिलांच्या कर्तुत्वाचा गौरव करीत जागतिक महिला दिन साजरा

रमाई समूहात महिलांच्या कर्तुत्वाचा गौरव करीत जागतिक महिला दिन साजरा

0
138

blank

नवी दिल्ली, 15: नवी दिल्लीतील रमाई समूहाच्या वतीने महिलांच्या कार्य कर्तुत्वाचा गौरव करीत जागतिक महिला दिन साजरा करण्यात आला.लोधी गार्डन येथे आयोजित कार्यक्रमात महिलांनी फॅशन शो, वकृत्व, प्रश्नमंजुषा स्पर्धा तसेच समूहातील महिलांमध्ये असणाऱ्या गुणांचे कौतुक करण्यात आले. या स्पर्धेत विजेता महिलांना अशोक स्तंभ भेट स्वरूपात देण्यात आले.

यामध्ये, उत्कृष्ट सहकार्य म्हणून ज्योत्स्ना वासनिक, उत्कृष्ट नेतृत्व गुण करिता सुजाता नंदेश्वर, शिस्तीसाठी सुनीता खंडारे, विश्वासार्हतेसाठी गीता ओके, स्मित हास्यासाठी सुजाता अंभोरे, साठ वर्षानंतर सक्रिय राहनाऱ्या जया नागराळे व पुष्पा नागराळे यांना सन्मानित करण्यात आले. यावेळी फॅशन शो ही आयोजित करण्यात आला आणि यामध्ये प्रथम विजेते म्हणून मनीषा मेश्राम, प्रथम रनर अप छाया पाटील, सेकंड रनर अप उज्वला मूल या ठरल्या. विजेत्या महिलांना पुरस्कार आणि साशे देऊन सन्मानित करण्यात आले.दर महिन्यात रमाई समूहातर्फे प्रबोधनात्मक कार्यक्रम आयोजित केले जातात. या समूहात सामील महिला या शासनाच्या वेगवेगळ्या विभागात उच्चपदस्थ आहेत.कामासह या समूहातील महिला या सामाजिक कामात सदैव तत्पर असतात.

blank