23.7 C
Gondiā
Saturday, August 29, 2026
Home Featured News कथाकथनाच्या संकल्पनांना एआय बनवेल अधिक रंजक

कथाकथनाच्या संकल्पनांना एआय बनवेल अधिक रंजक

0
41
-नागपूर चित्रपट महोत्सवात चलचित्र कार्यशाळेत सहभागी तज्ञांचे मत
नागपूर : कृत्रिम बुद्धिमत्ता तुमच्या कथाकथनाच्या संकल्पनांना अधिक रंजक बनवेल, असे मत चलचित्र कार्यशाळेत तज्ञ व्यक्तींनी व्यक्त केले. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ आणि नागपूर चलचित्र फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने जमनालाल बजाज प्रशासकीय भवनात २७,२८ व २९ मार्च २०२६ रोजी नागपूर चित्रपट महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवात शुक्रवार, दि.२७ मार्च रोजी सकाळी पार पडलेल्या चलचित्र कार्यशाळेत या विषयावर अधिक चर्चा करण्यात आली.
माननीय कुलगुरू डॉ. मनाली क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित नागपूर चित्रपट महोत्सवात ‘एआय सह कथाकथनाचे भविष्य’ या विषयावर आयोजित चलचित्र कार्यशाळेत प्रमुख अतिथी म्हणून मिक्सिओचे सीईओ अजिंक टाकावाले, मिक्सिओचे सीटीओ कौस्तुभ अग्रवाल व पियुष अग्रवाल यांची उपस्थिती होती. कोटा श्रीनिवास सभागृहात आयोजित चलचित्र कार्यशाळेत कथाकथनात कृत्रिम बुद्धिमत्तेचे (AI) महत्त्व या विषयावर प्रमुख अतिथींनी भाष्य केले. कृत्रिम बुद्धिमत्तेला कोणतीही कल्पकता नसते त्यामुळे कथा कथनक आपण स्वतः विचारपूर्वक लिहिले पाहिजे. आपण विचार करून लिहिलेल्या कथांना अधिक सरस अधिक रंजन बनविण्याकरिता मात्र यायची मदत घेता येईल, असे प्रमुख तज्ज्ञांनी सांगितले.
यावेळी मार्गदर्शन करताना पियुष अग्रवाल यांनी चित्रपट सृष्टीत एआयचा वापर वाढत असल्याची माहिती दिली. एआयचा अधिक वापर होत असल्याने आपण आपले मूलभूत तत्व विसरत चाललो असल्याचे सांगितले. त्यामुळे कथा लेखनामध्ये मूळ संकल्पना मानवीय म्हणजेच आपली असावी, कृत्रिम बुद्धिमत्तेची नसावी, असे पियुष अग्रवाल म्हणाले. नवीन कथा लेखकांनी स्वतः विचार करून (स्टोरी) कथा लिहावी. मात्र, त्याला अधिक रंजक बनविण्याकरिता एआयचा वापर करता येईल, असे त्यांनी सांगितले. कथा लिखाण कथा नका मधील मूलभूत बाबी समस्या गुंतागुंत कृत्रिम बुद्धिमत्ता सांगू शकत नसल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यक्रमात प्रमुख अतिथींचे स्वागत रवींद्र हरदास,जय गाला व अजय राजकारणे यांनी केले. कार्यशाळेला मोठ्या संख्येने चित्रपट प्रेमी, लेखक यांची उपस्थिती होती.