24.7 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home Top News पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात, 16 प्रवाशांचा मृत्यू

पाकिस्तानात भीषण रेल्वे अपघात, 16 प्रवाशांचा मृत्यू

0
31
स्लमाबाद, दि. 3 – पाकिस्तानमधील कराची येथे भीषण रेल्वे अपघात झाला असून 16 प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. 40 प्रवासी या अपघातात जखमी झाले आहेत. झकारिया एक्स्प्रेस आणि फरीद एक्स्पेस यांची समोरासमोर धडक होऊन हा भीषण अपघात झाला आहे. दोन महिन्यांमधील हा दुसरा भीषण अपघात आहे. ट्रेनमध्ये अडकलेल्या प्रवाशांना बाहेर काढण्याचं काम सुरु आहे.
अपघातानंतर रेल्वे सेवा पुर्णपणे बंद करण्यात आली होती. मृतांचा आकडा सध्या 16 असून तो वाढण्याची शक्यता आहे असं जावेन अकबर रियाज या पोलीस अधिका-याने सांगितलं आहे. जखमींना कराचीमधील जिन्नाह रुग्णालयात उपचारासाठी भर्ती करण्यात आलं आहे.