24.3 C
Gondiā
Sunday, August 16, 2026
Home विदर्भ विषप्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

विषप्राशन करून शेतकर्‍याची आत्महत्या

0
31

लाखांदूर दि.03:: तालुक्यातील एका ४५ वर्षीय शेतकर्‍याने कर्जाला कंटाळून विष प्राशन करून आत्महत्या केली. ही घटना लाखांदूर तालुक्यातील किन्ही (गुंजेपार ) येथे घडली. दिलीप मारोती चिरवतकर असे मृत शेतकर्‍याचे नाव आहे.
लाखांदूर तालुक्यातील किन्ही (गुंजेपार ) येथील दिलीप चिरवतकर या शेतकर्‍याकडे दोन एकर शेती असून दरवर्षी सतत नापिकीचा सामना करावा लागत असल्याने दिलीपवर कर्जाची रक्कम वाढली होती. मागील काही वषार्पासून बँक, बचतगट आणि खासगी सावकाराकडून चार लाख रूपयाच्या वर कर्ज आहे.
कर्ज काढून शेती केली मात्र नापिकीमुळे कर्जाची परतफेड करता आली नाही. त्यामुळे ते नेहमी तणावात राहत होते. मंगळवारला दुपारी सरांडी (बुज) रस्त्यावरील आपल्या शेतात जावून शेतातील धान पिकाची अवस्था बघून ते अधिकच हतबल झाले. दरम्यान, शेतात असलेल्या किटकनाशक प्राशन केल्याने ते जागेवरच पडून राहिले.
ही घटना शेताजवळील चिरवतकर यांच्या शेताला लागून असलेल्या ईश्‍वर शहारे यांच्या लक्षात आल्यानंतर शहारेनी गावातील विनायक तरारे यांना दिलीप शेतात बेशुद्ध अवस्थेत पडल्याची माहिती दिली.