रेल्वे एक्स्प्रेसमध्ये विद्यार्थ्यांना 60 टक्के सूट

0
11
वाढदिवसाच्या शुभेच्छा

जयपूर- रेल्वे प्रवाशांना खुशखबर आहे. ‘आयआरसीटीसी’च्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या विशेष रेल्वे गाड्यांमध्ये (स्पेशल ट्रेन) विद्यार्थ्यांसाठी तिकिट दरात 60 टक्के सूट मिळणार आहे. ही सुविधा फक्त स्लीपर कोचमध्ये दिली जाणार आहे. ही योजना एक वर्षासाठी प्रायोगित तत्त्वावर सुरु करण्यात आली आहे.

याशिवाय नवीन वर्षात राजधानीससह शताब्दी और दूरंतो एक्स्प्रेसमधून प्रवास करणार्‍या प्रवाशांना वाय फाय (Wi – Fi) सुविधा मिळणार आहे. प्रवास करताना प्रवाशांना स्मार्टफोन, लॅपटॉप आणि टॅबलेटवर उत्तम इंटरनेट कनेक्टिव्हिटी मिळेल.

विद्यार्थ्यांना अावश्यक असेल बोनाफाईड सर्टिफिकेट
रेल्वे मंत्रालयाचे प्रवक्ता अनिल सक्सेना यांनी सांगितले की, विद्यार्थ्यांसाठी देण्यात येणारी 60 टक्के सूट ही फक्त आयआरसीटीसीच्या माध्यमातून सुरु करण्यात आलेल्या टूर पॅकेजसाठी असेल. विशेष म्हणजे ही सूट मूळ भाड्यावर (बेसक फेअर) मिळेल. तसेच विद्यार्थ्याला शाळा अथवा महाविद्यालयाचे बोनाफाईड सर्टिफिकेट आवश्यक असेल. विद्यार्थ्याला हे सर्टिफिकेट संबंधित स्टेशनवर सादर करावे लागेल.
‘पायलेट प्रोजेक्ट’च्या धर्तीवर सुरु होतील सुविधा…
रेल्वे प्रशासनाने ‘पायलेट प्रोजेक्ट’च्या धर्तीवर नवी दिल्ली-हावडा राजधानी एक्स्प्रेसमध्ये WI-FI सुविधा सुरू केली आहे. राजधानी एक्स्प्रेसमध्ये हा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर पहिल्या टप्प्यात शताब्दी, राजधानी आणि दूरंतो एक्स्प्रेसमध्ये ही सुविधा सुरु करण्‍याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे. मार्च 2015 पर्यंत तिन्ही एक्स्प्रेसमध्ये WI-FI सुरु करण्याचे नियोजन आहे.