24.3 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home गुन्हेवार्ता समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक अन् कारची धडक; कारमधील चंद्रपूरच्या 5 जणांचा...

समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, ट्रक अन् कारची धडक; कारमधील चंद्रपूरच्या 5 जणांचा मृत्यू

0
199

अमरावती: जिल्ह्यातील धामणगाव रेल्वे तालुक्यात अपघाताची (Accident) भीषण घटना घडली असून या दुर्घटनेत 5 जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती आहे. समृद्धी महामार्ग चॅनल नंबर 104 च्या नजीक ट्रक आणि वॅगनार कारचा भीषण अपघात झाला.समृद्धी महामार्गावरील अपघातांची मालिका सुरूच असून आज पुन्हा एकदा अपघात झाल्याची दुर्दैवी घटना घडली. थेट नागपूर ते मुंबई सर्वात मोठी कनेक्टिव्हीटी म्हणून देशभरात नावारुपाला आला आहे. मात्र, गेल्या काही महिन्यात अपघातात महामार्गावर सातत्याने अपघाताच्या घटना घडल्याचं पाहायला मिळालं.कारमधील मृत झालेले सर्व प्रवासी चंद्रपूर येथील रहिवासी असून मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि एक मुलगी असल्याची माहिती आहे. याप्रकरणी, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केलाय, तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठविण्यात आले आहेत.