विदर्भात रुजू व्हा किंवा नोकऱ्या सोडा

0
10

नागपूर-विदर्भात सर्वच विभागांमध्ये ५० टक्के अधिकाऱ्यांच्या जागा रिक्त आहेत आणि अधिकारी तिथे काम करावयास तयार नाहीत. या जागा भरल्या जातील आणि अधिकाऱ्यांना नेमणूक झालेल्या ठिकाणी रुजू व्हावेच लागेल. जर त्यांना विदर्भात रुजू व्हायचे नसेल, तर नोकरी सोडावी लागेल, असे महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी विधान परिषदेत स्पष्ट केले.
विदर्भाच्या विकासासंदर्भात सभागृहात झालेल्या चच्रेला उत्तर देताना ते बोलत होते. विकासाअभावी विदर्भातील जनतेच्या मनात अन्याय झाल्याची भावना निर्माण झाली आहे. राजकारणाच्या पलीकडे जाऊन ही भावना दूर करावी लागेल, असेही खडसे म्हणाले