23.4 C
Gondiā
Wednesday, August 12, 2026
Home Top News लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात, 3 अधिका-यांचा मृत्यू

लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात, 3 अधिका-यांचा मृत्यू

0
35

पश्चिम बंगाल, दि. 30 – पश्चिम बंगालमधील सुकना येथे लष्कराच्या हेलिकॉप्टरचा अपघात झाला आहे. या अपघातात तीन अधिका-यांचा मृत्यू झाला आहे. तर एक अधिकारी गंभीर जखमी झाला आहे. सकाळी 10.30 वाजता हा अपघात झाला आहे. या अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

अपघातग्रस्त हेलिकॉप्टर लष्कराचं चित्ता हेलिकॉप्टर होतं. या हेलिकॉप्टरमध्ये 4 ते 5 लोकांच्या बसण्याची सोय असते. समुद्रसपाटीपासून सर्वाधिक उंचीवर उडणा-या हेलिकॉप्टरमध्ये चित्ताच्या नावावर जागतिक विक्रमाची नोंद आहे. दरम्यान हा अपघात कसा झाला याची माहिती घेतली जात आहे. पायलटची काही चूक होती की तांत्रिक बिघाड झाला होता तपासलं जात आहे.