25.5 C
Gondiā
Monday, August 17, 2026
Home Top News इस्तांबुलमधील नाईटक्लबमध्ये दहशतवादी हल्ला, 35 ठार

इस्तांबुलमधील नाईटक्लबमध्ये दहशतवादी हल्ला, 35 ठार

0
25

इस्तांबुल, दि. 01 – टर्कीमधील इस्तांबुल शहरातील एका नाईटक्लबमध्ये दहशतवादी हल्ल्यात 35 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, इस्तांबुलमधील रैना नाईटक्लबमध्ये नवीन वर्षाच्या पार्टीदरम्यान दहशतवाद्यांनी आत्मघाती हल्ला केला. येथील स्थानिक वेळेनुसार रात्री 1.30 च्या सुमारास हा आत्मघातकी हल्ला करण्यात आला. या हल्ल्यात 35 जणांचा मृत्यू झाला असून 40 हून अधिक जण जखमी झाले आहेत. आत्मघातकी हल्ला करणारा दहशतवादी हा नाईटक्लबमध्ये सांता क्लॉजचा ड्रेस परिधान करुन आल्याचे सांगण्यात येत आहे.