2020 पर्यंत ब्रॉडगेजवरील मानवविरहित रेल्वे क्रॉसिंग बंद होणार..

0
9

नवी दिल्ली -93 वर्षात प्रथमच यंदा रेल्वेचा अर्थसंकल्प हा मुख्य अर्थसंकल्पा अंतर्गत सादर करण्यात आला. या अर्थसंकल्पात रेल्वे सेफ्टी फंड अंतर्गत 5 वर्षांत रेल्वेला 1 लाख कोटींचा फंड दिला जाणार असल्याची घोषणा जेटलींनी केली. तसेच IRCTC च्या माध्यमातून तिकिट बुकिंग केल्यास सर्व्हीस चार्ज लागणार नाही. या अर्थसंकल्पात रेल्वेबाबत नेमक्या काय घोषणा करण्यात आल्या

शेयर मार्केटमध्ये लिस्टेड होणारIRCTC​

– रेल्वेची कंपनी, आयआरएफसी, इरकॉन आणि आयआरसीटीसी शेयर मार्केटमध्ये लिस्टींग केले जाईल.
– 2017-18 मध्ये रेल्वे इन्व्हेस्टमेंटमध्ये एक लाख 31 हजार कोटींची असेल त्यापैकी 55 हजार कोटी सरकार देईल. 2016-17 मध्ये हा आकडा एक लाख 21 हजार कोटी होता.
2020 पर्यंत ब्रॉडगेजवरील मानवविरहित रेल्वे क्रॉसिंग बंद होणार..
माझा प्रवास
– जेटली म्ङणाले, रेल्वे सेफ्टी फंड अंतर्गत पाच वर्षांसाठी रेल्वेला 1 लाख कोटी मिळणार आहेत.
– सरकार या निधीचा वापर व्हावा यासाठी दिशानिर्देश तयार करणार आहे.
– 2020 पर्यंत ब्रॉडगेज लाइनवर मानवविरहित रेल्वे क्रॉसिंग पूर्णपणे बंद होईल.
– रेल्वे एका ठिकाणाहून दुसरीकडे इंटिग्रेट ट्रान्सपोर्ट सोल्यूशनही आणेल.
– पर्यटन आणि तिर्थक्षेत्रांसाठी खास रेल्वे सुरू करणार.
माझ्या सुविधा
– 25 स्थानकांचा पुनर्विकास केला जाईल. 2017-18 मध्ये 25 स्टेशनला पुरस्कारही दिला जाईल.
– 500 स्टेशन हे दिव्यांगांच्या सोयींचा विचार करून तयार केले जातील. या स्टेशनवर एस्कलेटर्स आणि लिफ्ट लावल्या जातील.
– 7000 स्टेशन सौर ऊर्जेवर चालवली जातील.
– नव्या मेट्रो रेल्वे धोरणाची घोषणा करणार. नवीन कायदा तयार करणार. त्यातून प्रायव्हेट पार्टिसिपेशनमध्ये मदत मिळेल. तरुणांना रोजगार मिळण्यास मदत होईल.
– 2019 पर्यंत सर्व डब्ब्यांत बायो टॉयलेट्स लावले जातील.
– रेल्वेत एसएमएसद्वारे ‘क्लीन माय कोच’ चा विस्तार करून ‘कोच मित्र’ सुविधा सुरू केली जाईल. हे कोच मित्र तुमच्या डब्ब्याशी संबंधित सर्व समस्या सोडवतील.