5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के प्राप्तिकर

0
4

नवी दिल्ली, दि. 1 – नोटाबंदीच्या निर्णयानंतर सादर होत असलेल्या अर्थसंकल्पात प्राप्तिकर भरणाऱ्यांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत होती. मात्र वित्तमंत्री अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पामधून प्राप्तिकर भरणाऱ्यांना हातचे राखून दिलासा दिला आहे. अर्थसंकल्पातून टॅक्स स्लॅबमध्ये कोणतेही फेरबदल न करता जेटली यांनी अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असलेल्या वर्गाकडून आता 10 ऐवजी 5 टक्केच प्राप्तिकर आकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले. त्यामुळे प्राप्तिकराच्या चौकटीत मोठे फेरबदल होण्याची अपेक्षा बाळगून असलेल्यांना अंशत: दिलासा मिळाला आहे.
जेटली यांनी प्राप्तिकराच्या चौकटीत फेरबदल जाहीर केले नाहीत. मात्र अडीच ते पाच लाख रुपयांपर्यंत उत्पन्न असणा-यांकडून आता 10 ऐवजी 5 टक्केच कर आकारण्याची घोषणा करण्यात आली आहे. त्याबरोबरच 5 ते 10 लाख रुपये उत्पन्न गट व 10 लाख रुपयांवरील उत्पन्न असणा-या गटासाठीची कररचना जैसे थेच ठेवण्यात आली आहे. ही कररचना आधीप्रमाणेच अनुक्रमे 20 व 30 टक्केच आकारण्यात आली आहे. त्याबरोबरच 50 लाख तेऔ कोटी असलेल्यांच्या उत्पन्नावर 10 टक्के सरचार्ज लावण्यात येणार आहे. जास्तीत जास्त लोकांनी इन्कम टॅक्स भरावा यासाठी पहिल्यांदाच इन्कॅम रिर्टन फाईल करणा-यांची चौकशी होणार नाही, असे अरुण जेटली यांनी सांगितले.
तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त
केंद्र सरकारने आता तीन लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त केले आहे. याआधी 2.5 लाखांपर्यंतचे उत्पन्न करमुक्त होते. त्याचप्रमाणे 50 हजार रुपयांची सवलत (रिबेट) देण्यात आली आहे. म्हणजेच आता 3 लाख रुपयांपर्यंतच्या उत्पन्न असणाऱ्यांना काहीही टॅक्स द्यावा लागणार नाही.

5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर
2.5 लाख ते 5 लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 5 टक्के कर आकारण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे. याआधी यावर 10 टक्के कर आकारला जात होता. शिवाय 5 लाखांवरील उत्पन्नधारकांना करात 12,500 रुपयांची सवलत मिळणार आहे. म्हणजेच अंदाजे दोन लाख रुपयांच्या उत्पन्नावर 1 हजार रुपये कर भरावा लागेल.

5 ते 10 लाख उत्पन्न 20 टक्के कर
5 ते 10 लाख लाखांपर्यंतच्या उत्पन्नावर 20 टक्के कर आकारला जाणार आहे. यामध्ये चालू अर्थसंकल्पात कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

10 लाखांवरील उत्पन्न 30 टक्के कर
10 लाखांहून अधिक उत्पन्न मिळविणार्‍या गटाला 30 टक्के कर द्यावा लागणार आहे. यामध्ये देखील कोणताही बदल करण्यात आलेला नाही.

उच्च उत्पन्न गटातील लोकांना कर
50 लाख ते 1 कोटी उत्पन्नधारकांना कर द्यावा लागेल. त्याशिवाय त्यांना 10 टक्के अधिक सरचार्जही भरावा लागणार आहे. 1 कोटीहून अधिक उत्पन्नधारकांना कराबरोबरच 15 टक्के अधिक सरचार्ज द्यावा लागेल.
अर्थसंकल्पातील प्रमुख वैशिष्ट्ये :

3 लाखांवरील व्यवहार रोखीने करण्यास बंदी
3 लाखांवरील व्यवहार बँकेद्वारेच करावे लागणार
1.7 लाख नागरिकांनी 50 लाखांपेक्षा अधिक उत्पन्न दाखविले
24 लाख नागरिकांनी 10 लाखांहून अधिक उत्पन्न दाखविले
52 लाख नागरिकांनी 5 ते 10 लाखांपर्यंत उत्पन्न
76 लाख नागरिक 5 लाखांपर्यंत अधिक उत्पन्न दाखवितात
99 लाख नागरिकांनी अडीच लाखांहून कमी उत्पन्न दाखविले
3 वर्षांत 3.2 टक्के वित्तीय तूट
20 लाख व्यापाऱ्यांनी 5 लाख रुपये उत्पन्न दाखविले
दोन वर्षांत कर संकलनात 17 टक्के वाढ कायम
मध्यमवर्गीयांना करात सवलत देणार
50 कोटी रुपयांची वार्षिक उलाढाल असलेल्या कंपन्यांना 5 टक्के करात सवलत
आता छोट्या उद्योगांना 25 टक्के कर भरावा लागणार
घरांच्या कार्पेट एरियाच्या मर्यादेत वाढ
बिल्टअप एरिया कार्पेट एरिया म्हणून ग्राह्य धरणार
छोट्या कंपन्यांच्या कॉर्पोरेट करात कपात
ज्येष्ठ नागरिकांसाठी हेल्थ कार्ड सुरु करणार
आधारकार्डद्वारे खरेदी करता येणार, डेबिट कार्डप्रमाणे वापर करता येणार
पोस्ट ऑफिस मुख्यालयातून पासपोर्ट मिळणार
सैनिकांना तिकीट खरेदीसाठी रांगेत उभे राहण्याची गरज नाही
देशभरात 100 स्कील सेंटर सुरु करणार
उच्च शिक्षणासाठी युजीसीमध्ये बदल करणार
ई-तिकीट खरेदीवर सर्व्हिस चार्ज लागणार नाही
डॉक्टरांची संख्या वाढविण्यासाठी प्रवेशसंख्या वाढविणार
ज्येष्ठ नागरिकांसाठी एलआयसीकडून आठ टक्के व्याजदराची योजना
वरिष्ठ nagarikansathi संलग्न adharasi helthakarda denara
तरुणांना ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी स्वयंम नावाची योजना सुरु करणार
गर्भवती महिलांना 6 हजार रुपये मदत देणार
डाळीचे उत्पादन वाढ होईल, त्यामुळे दरावर नियंत्रण राहिल
प्रत्येक नागरिकाला घर देण्याचा आमचा प्रयत्न आहे
कच्च्या तेलाच्या किंमती आणि पेट्रोलच्या किंमती कमी होण्याची शक्यता