प्रजासत्ताक दिनी राजस्थानात स्फोट घडवण्याची आयएमची धमकी

0
15

जयपूर – प्रजासत्ताक दिनी राजस्थानमध्ये बॉम्बस्फोट घडवून आणण्याची धमकी देणारा ई-मेल इंडियन मुजाहिद्दीन या दहशतवादी संघटनेकडून राजस्थानच्या मंत्र्यांना पाठवण्यात आला आहे.
‘आम्ही इंडियन मुजाहिद्दीन आहोत. तुम्ही सावध राहा. आम्ही तुम्हाला एक मोठे सरप्राईज देणार आहोत. २६ जानेवारीला राजस्थानमधील अनेक भागात स्फोट घ़डवून आणू. थांबवता येत असेल तर थांबवा’ अशी धमकी या मेलमध्ये देण्यात आली आहे. राजस्थानच्या १० कॅबिनेट तसेच चार राज्य मंत्र्यांना अशा प्रकारचा ईमेल आला आहे.
दरम्यान, पोलीस या प्रकरणाची चौकशी करत आहेत. ही खरच धमकी आहे की राज्यात भितीचे वातावरण निर्माण करण्यासाठी कोणी तरी चेष्टा करत आहे याचा तपास सुरु आहे. हे ईमेल कुठून आले आणि कोणी पाठवले याचाही तपास सुरु असल्याचे राजस्थानचे मुख्य पोलीस अधिकारी उपेंद्र भारद्वाज यांनी सांगितले.
दरम्यान, राजस्थान सरकारने पोलीस आणि सुरक्षा यंत्रण सतर्क असून नागरिकांनी घाबरुन नये असे आवाहन केले आहे. आम्हाला याबाबत माहिती मिळाली असून त्याप्रमाणे प्रत्येक विभागाल सतर्कतेचे आदेश देण्यात आले आहेत. योग्य ती सुरक्षेचे उपाय करण्यात येतील असे राजस्थानचे गृहमंत्री गुलाब चंद कटारिया यांनी सांगितले.