36.5 C
Gondiā
Monday, June 22, 2026
Home Top News जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान जखमी

जम्मू काश्मिरात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन जवान जखमी

0
20

श्रीनगर, दि. 14 – बंदिपोरा जिल्ह्यात सुरक्षा जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत दोन जवान जखमी झाले आहेत. जिल्ह्यातील हाजीन परिसरात ही चकमक सुरु आहे. सोमवारी दक्षिण काश्मीरमध्ये दहशतवाद्यांसोबत झालेल्या चकमकीत दोन जवान शहीद झाल्यानंतर मंगळवारी पुन्हा दहशतवाद्यांनी हल्ला केला आहे.