29.1 C
Gondiā
Monday, August 10, 2026
Home Top News जिल्हा परिषदांसाठी मतदानाला सुरूवात

जिल्हा परिषदांसाठी मतदानाला सुरूवात

0
28

मुंबई, दि. १६ – राज्यातील पहिल्या टप्प्यातील १५ जिल्हा परिषदा आणि १६५ पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदानास सुरूवात झाली आहे. या निवडणुकीमुळे ग्रामीण भागातील जनतेचा कौल स्पष्ट होईल. आज जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, परभणी, हिंगोली, बीड, नांदेड, उस्मानाबाद, लातूर, बुलडाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली येथील एकूण २, ५६७ जागांकरिता ११, ९८९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहेत. २४, ०३१ मतदान केंद्रांची व्यवस्था करण्यात आली असून सकाळी ७.३० ते संध्याकाळी ५.३० पर्यंत मतदान करता येणार आहे. ‘मिनी मंत्रालय’ अशी ओळख असलेल्या जिल्हा परिषदांमध्ये यावेळी राज्यपातळीवर कोणत्याच पक्षांची आघाडी आणि युती झाली नसल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना आणि भारतीय जनता पक्ष स्वबळावर निवडणूक लढवित आहेत.
पांगरमल येथे बनावट दारुमुळे 4 जणांचा मृत्यू प्रकरण, ग्रामस्थांचा मतदानावर बहिष्कार, मतदान केंद्रावर शुकशुकाट
दिग्रस तालुक्यातील कळसा येथे जिल्हा परिषद निवडणूक मतदान केंद्राबाहेर हाणामारी. काँग्रेस कार्यकर्त्याला भाजपा कार्यकर्त्यांकडून मारहाण.