मुंबईत भाजप महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक लढवणार नाही- फडणवीस

0
8

मुंबई,दि. 4- मुंबई महापालिकेत महापौर, उपमहापौरपदाची निवडणूक भाजप लढवणार नसल्याची महत्त्वपूर्ण तितकीच धक्कादायक घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. मुंबईच्या हिताच्या सर्व मुद्द्यांवर शिवसेनेला समर्थन देणार असल्याचेही फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्यभरात भाजपला मिळालेल्या यशाचे त्यांनी भरभरून कौतुक केले आहे.मुंबईत महापौरपदासोबतच उपमहौपर, स्थायी समिती अध्यक्ष, बेस्ट समितीची निवडणूकही भाजप लढणार नाही, अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.मुंबई महापालिकेत भाजप विरोधी पक्षाची भूमिकेत राहणार नाही, तर पारदर्शकतेचे पहारेकरी म्हणून भूमिका भाजप निभावले, असे मुख्यमंत्री म्हणाले.मुंबईच्या हितासाठी निर्णय घेतला असून, गरज पडल्यास शिवसेनेला मदत करु. मात्र, शिवसेना सोडून इतर कोणत्याही पक्षाला मतदान करणार नाही, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

“मुंबईच्या महापौरपदाची निवडणूक भाजप लढवत नाही, ही आनंदाची बाब आहे. मुंबईकरांचा कौल भाजपने स्वीकारल्याचा आनंदच आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देतो आणि उद्धव ठाकरेंचंही अभिनंदन करतो.”, असे शिवसेनेचे नेते आणि परिवहन मंत्री दिवाकर रावते यांनी दिली.