पाकच्या गोळीबारात भारताचा जवान शहीद

0
15

श्रीनगर, दि. ३१ – सीमा रेषेवर पाक सैन्याची आगळीक सुरुच असून बुधवारी पाक सैन्याने केलेल्या गोळीबारात भारताच्या सीमा सुरक्षा दलाचा (बीएसएफ) एक जवान शहीद झाला आहे. या गोळीबारात आणखी एक जवान जखमी झाल्याचे वृत्त असून त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
पाकिस्तान सैन्याच्या रेंजर्सकडून वारंवार शस्त्रसंधीचे उल्लंघन केले जात आहे. बुधवारी सकाळी पाक रेंजर्सनी जम्मू काश्मीरमधील सांबा सेक्टरमधील भारतीय चौक्यांवर गोळीबार केला. यामध्ये बीएसएफचा एक जवान शहीद झाला. गेल्या आठवडाभरात पाक सैन्याने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याची ही सहावी घटना आहे. भारताचे संरक्षण मंत्री मनोहर पर्रीकर यांनी बुधवारी पाकसोबत योग्य वेळी चर्चा होईलच पण तोपर्यंत सीमा रेषेवर भारतीय सैन्य पाकला चोख प्रत्युत्तर देऊ असे विधान केले होते.