बिरसी विमानतळावरील प्रशिक्षणार्थी विमान कोसळले,दोन पायलट ठार

0
10

खेमेंद्र कटरे गोंदिया,दि.२६-berartimes.com– गोंदिया येथील बिरसी विमानतळावरील (राजीव गांधी विमान प्रशिक्षण) नॅशनल फ्लाईंग अकॅडमीचं (NFTI) केंद्रातील एका प्रशिक्षणार्थी विमानाला आज बुधवारला सकाळी ९ वाजेच्या सुमारास अपघात होऊन दोन पायलट जागीच ठार झाल्याची घटना घडली.सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रशिक्षणार्थी वैमानिक आपल्या वरिष्ट पायलटसोबत प्रशिक्षणार्थी विमानाने विमानतळावरुन उड्डाण घेतल्यानंतर गोंदियापासून पश्चिमेला असलेल्या देवरी (रायपूर)जवळील घोडीटोला-लावणी गावाच्या मध्ये असलेल्या नदीच्या मधल्या पात्रात प्रशिक्षणार्थी विमान कोसळले.विमान कोसळल्याचे लक्षात येताच आजुबाजूच्या नागरिकांनी धाव घेत पोलिसांना माहिती दिली.
अचानक विमानात बिघाड आल्याचे पायलटच्या लक्षात आले.सावधगिरी बाळगत ते विमान उतरविण्याच्या प्रयत्न करीत असतानाच देवरीजवळून वाहणाèया वैनगंगा नदीकिनाèयावर असलेल्या सरीता जलमापन केंद्र देवरीच्या लिफ्टएरीगेशनच्या तारेला आधी आढळल्यानंतर तो विमान नदीत असलेल्या डोंग्याला आढळल्याने हा अपघात घडल्याची माहिती स्थानिकांनी बेरार टाईम्सच्या प्रतिनिधींना दिली.मृत पायलटमध्ये वरिष्ट प्रशिक्षक राजन गुप्ता(वय ३८) यांचा समावेश असून प्रशिक्षणार्थी पायलट ही कु.शिवानी (वय २०) असल्याचे सांगितले जात आहे.घटनेची माहिती मिळाल्यानंतर विमानतळ प्राधिकरणाच्या अधिकाèयांनी घटनास्थळावर धाव घेतली सोबतच गोंदिया पोलिसासह मध्यप्रदेशातील पोलीसही घटनास्थळी पोचले असून रुग्णवाहिकाही लगेच पोचल्याची माहिती तेथील नागरिकांनी दिली.सदर अपघातात विमानाची पुर्णता वाताहत झालेली आहे.