बिहारमध्ये विहिरीत आढळले ३० बॉम्ब

0
13

किशनगंज : येथील मतियारी गावातील एका विहिरीत नागरिकांना ३० बॉम्ब आढळून आले आहेत. पोलिसांनी हे बॉम्ब बाहेर काढले असून, ते बराच काळ पाण्यात राहिल्याने निकामी झाले आहेत.

पोलीस अधिकारी अखिलेश कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, काही समाजकंटकांनी हे बॉम्ब एका पोत्यात भरून विहिरीत टाकून दिले असावेत, असा अंदाज आहे. ते पोलिसांच्या हाती लागू नयेत वा कुठेतरी लपवून ठेवावेत या उद्देशाने त्यांनी तसे केले असावे, असेही ते पुढे म्हणाले.

मात्र विहिरीत पडलेले हे पोते कालांतराने मोकळे होऊन त्यातील बॉम्ब विहिरीच्या पाण्यावर तरंगू लागले आणि नागरिकांनी त्याची दखल घेऊन तात्काळ पोलिसांना कळविले. ३० नोव्हेंबर २०१४ रोजी येथे झालेल्या बॉम्बस्फोटात तीन गुन्हेगार ठार झाले होते, तर काही नागरिक जखमी झाले होते. दहशतवाद्यांचे एखादे पथक येथे बॉम्बस्फोट

घडवून आणण्यासाठी आले असावे व पळून जाताना त्यांनी उरलेले बॉम्ब विहिरीत फेकले असावेत, असाही अंदाज व्यक्त केला जातो

आहे. (वृत्तसंस्था)