पुणे-केंद्रीय लोकसेवा आयोगाकडून (यूपीएससी) घेण्यात येणारी ‘लोकसेवा पूर्वपरीक्षा’ यावर्षी २३ ऑगस्टला होणार असून १६ मे रोजी त्याबाबतची अधिसूचना जाहीर होणार आहे.
केंद्रीय लोकसेवा आयोगाने यावर्षीच्या परीक्षांचे वेळापत्रक जाहीर केले आहे. त्यानुसार यावर्षी लोकसेवा पूर्वपरीक्षा आणि भारतीय वनसेवा परीक्षा २३ ऑगस्टला होणार आहे. त्याबाबतची अधिसूचना १६ मे रोजी जाहीर होणार आहे, तर जूनमध्ये परीक्षेचे अर्ज भरता येणार आहेत. लोकसेवा मुख्य परीक्षा १८ डिसेंबरपासून सुरू होणार आहे. वनसेवा मुख्य परीक्षा २१ नोव्हेंबरपासून सुरू होणार आहे. केंद्रीय सशस्त्र पोलीस दलातील भरतीची पूर्व परीक्षा १२ जुलैला होणार असून ११ एप्रिलला त्याबाबतची अधिसूचना जाहीर होणार आहे.
यूपीएससी पूर्वपरीक्षा २३ ऑगस्टला
वाढदिवसाच्या शुभेच्छा