मतदार ओळखपत्रे कचèयाच्या ढिगाèयात,दोषी अद्यापही मोकाट

0
17

आंधळ्या जिल्हा प्रशासनाला केव्हा जाग येणार
गोंदिया : येथील जुन्या तहसिल व एसडीओ कार्यालयाच्या इमारतीचे नव्याने बांधकाम करण्यासाठी या इमारतीला रिकामे करण्यात आले.दरम्यान कार्यालय स्थानातंरनातर कागदपत्र बघून ती संबधित अधिकाèयाने ठेवायला हवी होती.परंतु निवडणुक विभागाच्या नायब तहसिलदारापासून ते कर्मचाèयांपर्यंत सर्वांनीच त्याकडे दुर्लक्ष केल्याने चक्क ५ हजाराच्यावर मतदारओळखपत्र आणि याद्या या संजयनगरातील कव्वाली मैदानाच्या कचèयाच्या ढिगाèयात सोमवारी आढळल्या.यावरुन प्रशासकीय यंत्रणा आपल्या कामाप्रती किती सजग आहे,हे चित्र बघावयास मिळाले.एवढे प्रकरण होऊनही एकाही कर्मचाèयावर तत्काळ कारवाई करण्याचे धाडस जिल्हा प्रशासन न दाखवू शकल्याने चोर चोर मवसेरे भाई अशीच परिस्थिती आहे की काय अशा चर्चा होऊ लागल्या आहेत.
नुकत्याच घेण्यात आलेल्या लोकसभा व विधानसभेच्या निवडणुकांत कित्येकांना मतदार ओळखपत्र मिळाले नसल्याने मतदानापासून वंचित रहावे लागले. दुसरीकडे हजारोंच्या संख्येत मलब्यात हे कार्ड सापडल्याने नागरिकांत एकच रोष दिसून येत आहे. शिवाय मतदारांच्या जागृतीसाठी व मतदानासाठी शासनाकडून जाहीरातींवर लाखो रूपये खर्च केले जातात. दुसरीकडे येथील तहसील कार्यालय प्रशासनाकडून असा बेजबाबदार कारभार केला जात असल्याने शासकीय यंत्रणा किती ईमानेइतबारे काम करीत आहे याची प्रचिती येते. या प्रकरणी संबंधितांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून केली जात आहे.
येथील तहसील कार्यालयाच्या नव्या इमारतीचे बांधकाम करावयाचे असल्याने मागील दोन महिन्यांपासून जुन्या इमारतीला पाडण्याचे काम सुरू आहे. या जुन्या इमारतीचा मलबा मागील १५ दिवसांपासून संजय नगर परिसरातील कव्वाली मैदानजवळील राकेश टेंभरे यांच्या प्लॉटमध्ये टाकला जात आहे. या प्लॉटलाच लागूनन सार्वजनिक शौचालय आहे. सोमवारी (दि.५) सकाळी परिसरातील काही नागरिक शौचालयाला गेले असता त्यांना मलब्यात मतदार कार्ड व मतदार याद्या दिसून आल्या. कचèयात मतदार ओळखपत्र गेलेच कसे या प्रश्नाने अचंबित झालेल्या नागरिकांनी ही बाब परिसरात वाèयासारखी पसरली.
दरम्यान या घटनेची माहिती मिळताच उपजिल्हा निवडणूक अधिकारी एन.के.लोणकर, उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, तहसीलदार संजय पवार व परिसराचे तलाठी घटनास्थळी पोहोचले. पाहणी केली असता सुमारे पाच हजार मतदार कार्ड, मतदार याद्या व हफनामे मलब्यात आढळले. अधिका‍èयानी ते सर्व कागदपत्र ताब्यात घेतले.