मुंबईला भूकंपाचा धोका : भूगर्भशास्त्रज्ञांचा दावा

0
10

वृत्तसंस्था,
मुंबई-भारताची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईला आगामी काळात भूकंपाचे धक्के बसणार असल्याची भीती भूगर्भशास्त्रज्ञ व्ही. सुब्रमण्यम यांनी व्यक्त केली आहे. मुंबईत सुरू असलेल्या १०२ व्या इंडियन कॉंग्रेस सायन्सच्या एका चर्चासत्रात बोलताना ही शक्यता त्यांनी वर्तवली आहे. हे भूकंपाचे धक्के ६.२ ते ६.५ रिश्टर स्केल इतक्या मोठ्‌या तीव्रतेचे असतील, असेही त्यांनी सांगितले.
भूकंपाचा धोका विशेषतः २३ मजल्यांपेक्षा जास्त उंचीच्या इमारतींना अधिक आहे. त्यामुळे ‘गगनचुंबी इमारतींची निर्मिती करण्याचं काम थांबलं पाहिजे. शिवाय विचित्र पद्धतीने बांधल्या जाणार्‍या इमारतींसाठी ही धोक्याची घंटा आहे. त्याचबरोबर भूगर्भ शास्त्रज्ञांकडून या संपूर्ण परिसराचा अभ्यास करवून त्यावर तात्काळ उपाययोजना करण्याची मागणी व्ही. सुब्रमण्यम यांनी केली आहे.