गोंदिया झेडपी सीईओपदी राहुल रेकवार,महाराष्ट्र सदनात आभा शुक्ला

0
11

गोंदिया : दिल्लीतील महाराष्ट्र सदनाचे वादग्रस्त निवासी आयुक्त बिपीन मलिक यांची केंद्र सरकारच्या कामगार व रोजगार मंत्रालयात सहसचिव पदावर बदली करण्यात आली आहे. त्यांच्या जागी आभा शुक्ला यांची बदली करण्यात आली आहे.विशेष म्हणजे आभा शुक्ला यांनी गोंदिया जिल्हा परिषदेच्या सीईओ पदाची धुरा सांभाळली होती. गोंदिया जिल्हा परिषदेच्या सीईओपदी नागपूर येथील उपजिल्हाधिकारी राहुल रेकवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.रेकवार यांची जिल्हा परिषदेच्या सीईओपदी पहिलीच नियुक्ती आहे.ते डी.डी.शिंदे यांच्या जागेवर येत आहेत.शिंदे यांना मात्र अद्यापही पोस्टींग देण्यात आलेले नाही.तर गडचिरोलीचे उपजिल्हाधिकारी पी.शिवशंकर यांची कोल्हापुर महापालिके,ब्रम्हपुरीच्या उपविभागीय अधिकारी दिपा मुढोल बुलडाणा जीप सीईओ,चामोर्शीचे उपजिल्हाधिकारी एम देेवेदंरसिंग यांची अकोला जीप सीईओ,किनवटचे उपजिल्हाधिकारी अभिजित चौधरी यांची औऱगांबाद जीप सीईओ,धारणीचे उपजिल्हाधिकारी संजय मीना यांची वरधा जिल्हा परिषद सीईओ,उदय चौधरी धुले जीप सीईओ,सचिन कुरवे यांची नागपूर येथील महाराष्ट्र रोजगार हमी योजनेच्या आयुक्तपदी नियुक्तीचे आदेश आज देण्यात आले.2011 बॅचचे आयएएस अधिकारी यांना जिल्हा परिषदेच्या सीईओ पदावर पहिली नियुक्ती देण्यात आली.