रुग्णवाहिका, अग्निशमन दलाच्या गाड्यांवर लाल दिवा

0
15

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयाने सशस्त्र दल, दिल्ली पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल यासह अन्य आपत्कालिन सेवांच्या वाहनांवर लालदिवा लावण्यास परवानगी दिली असून अशी सेवा देणा-या वाहनांना आवश्यकता भासल्यास अन्य रंगाचे दिवेही लावता येऊ शकतात, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश एच. एल. दत्तू, न्यायमूर्ती ए. के. सिकरी आणि न्यायमूर्ती आर. के. अग्रवाल यांच्या पीठाने दिल्ली सरकारने केलेल्या विनंतीचा विचार करून १० डिसेंबर २०१३ रोजी दिलेल्या आदेशात बदल करीत सशस्त्र दल, दिल्ली पोलिस, रुग्णवाहिका, अग्निशमन दल आणि अन्य आपत्कालिन सेवेच्या वाहनांना लालदिवा लावण्यास परवानगी दिली.
दिल्ली सरकारने सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशात बदल करण्याची मागणी करीत निळ्या दिव्याऐवजी लाल दिव्यांना परवानगी द्यावी. कारण लाल दिव्याचा प्रकाश अधिक तेजदार असल्याने तो दुरून दिसण्यास मदत होते. तसेच हा प्रकाश धुक्यालाही भेदून जातो, असे म्हटले होते. याची दखल घेऊन सर्वोच्च न्यायालयाने लाल दिवा लावण्यास परवानगी दिली आहे.