आदिवासी लाभार्थ्यांचे 12 धनादेश गहाळ

0
13

देवरी पंचायत समितीतील प्रकारः बोगस लाभार्थ्यांना वाटपः बनावट खाती उघडल्याचा संशय

देवरी- तहसील कार्यालयातील कोट्यवधीच्या घोटाळ्याची शाई वाळते न् वाळते तोच आता पंचायत समितीतून आदिवासी लाभार्थ्यांचे 12 धनादेश गहाळ झाल्याचा खळबळजनक प्रकार उजेडात आला आहे. लाभार्थ्यांचे नावे असलेले धनादेश भलत्यांनाच देण्यात आल्याने बोगस खाती उघडून पैसे काढण्यासाठी हा प्रकार झाला असावा, अशी शंका व्यक्त केली जात आहे. या प्रकारामध्ये अधिकारी-कर्मचाऱ्यांसह काही पदाधिकारीही सामील असल्याचा आरोप आहे.
पंचायत समिती ही नेहमी विविध कारणांमुळे प्रकाशझोतात राहते. कधी शिक्षण,पाणी पुरवठा, कृषी विभागातील भोंगळ कारभार यापूर्वी चव्हाट्यावर आले. आता घरकुलांच्या माध्यमातून बांधकाम विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित होऊ लागले आहेत. पंचायत समितीच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना इंदिरा आवास योजनेअंतर्गत 2013-14 या अर्थिक वर्षात घरकूल मंजूर झाले. त्यांचे बांधकाम देखील लाभार्थ्यांनी केले. काम पूर्ण झाल्यामुऴे लाभार्थ्यांनी बांधकाम विभागात धाव घेतली. दरम्यान, संबंधित लिपिकाने त्यांचे धनादेश भलत्याच व्यक्तीने घेऊन गेल्याचे सांगितले.त्यामुळे गरीब आदिवासी लाभार्थ्यांच्या पायाखालची वाळू सरकली. रेहाडी येथील परमानंद शंकर मरकाम,जयराम सोनू काटेगा,सातऊ कुटल मडावी, अगनू उमेद मडावी, रतूलबाई बुडान मडावी,डोंगरगाव येथील फुलवंता रामचंद चाकाटे,कोटजांभोरा येछीलजोहरूसिंग मथऊ कलचाम,ध्यानसिंग रणजीत नेताम, तुमडीमेढा येथील रामसूरज परदेशी अऱकरा,मधूकर सधिया सलामे,रामाऊ जेठू पडोटीआणि रजायबाई गवतू नरेटी अशी लाभार्थ्यांंची नावे आहेत. त्यांनी वित्त विभागातील लिपिक हाडगे यांनी त्याचे धनादेश रेहडी येथील धनलाल बेहारी मडावी आणि शेंडा येथील मडावी घेऊन गेल्याचे सांगितले. ज्यांना धनादेश दिले, त्यांचे लाभार्थ्यांशी काही देणे-घेणे नाही. आपले धनादेश मिळावे, यासाठी हे गरीब आदिवासी लाभार्थी लांबवरून पंचायत समितीच्या चकरा मारत आहेत. या लाभार्थ्यांनीकर्ज काढून आपल्या घरकुलांचे बांधकाम पूर्ण केले आहे. त्यामुऴे सावकार पैशासाठी तगादा लावत आहेत. यामुळे त्यांनी गटविकास अधिकारी यांना निवेदन देऊन घरकुलाचे धनादेश लवकर देण्याची मागणी केली आहे.