बॅकफुटवर गेलेल्या माओवाद्यांनी पुन्हा डोके काढले

0
20

गोंदिया,दि.२९– पोलिसांच्या वाढत्या दबावामुळे गेल्या काही महिन्यापासून बॅकफूटवर गेलेल्या माओवाद्यांनी आपले अस्तित्व दाखविण्याचा पुन्हा एकदा प्रयत्न सुरू केला आहे.सोमवारी झालेल्या चकमकीत माओवाद्यांच्या गोळीबारात केंद्रीय राखीव दलाचा एक जवान शहीद, तर दोन जवान गंभीर जखमी झाले.त्यातच काल मंगळवारला पुन्हा एका आदिवासी युवकाची हत्या माओवाद्यांनी केली आहे. आठवड्याभरात गडचिरोली जिल्ह्यात सहा बळी घेऊन माओवाद्यांनी पुन्हा सुरक्षा यंत्रणेला आव्हान दिले आहे. पोलिस खबèया असल्याच्या संशयातून तीन नागरिकांना ठार केले तर एका आदिवासी दाम्पत्यावर गोळीबार केला. त्यानंतर जवानांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे.
कोरची तालुक्यातील कोटगूल येथे २४ नोव्हेंबरला भूसुरुंग स्फोटात एक जवान शहीद झाला होता. ही घटना ताजी असतानाच रविवारी रात्री पुन्हा पोलिस पथकावर हल्ला केला. सातत्याने होणाèया या हल्लयांमुळे माओवाद्यांचा हैदोस थांबणार केव्हा, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.त्यातच कोटगूलच्या आठवडी बाजाराजवळ नक्षल्यांनी केलेल्या भूसुरुंगस्फोटात एक जवान शहीद झाल्यानंतर अनेक प्रश्न उभे ठाकले आहेत. पोलिसांचा अतिआत्मविश्वास आणि बॉम्बशोधक यंत्राची गुणवत्ता हे दोन मुद्दे सध्या ऐरणीवर असताना कुरखेडा उपविभागांतर्गत पोमके ग्यारापत्ती हद्दीतील पडियलमेट्टाच्या जंगलात ग्यारापत्ती पोस्ट पार्टी आणि सीआरपीएफच्या संयुक्त माओवादविरोधी अभियान राबवितांना गेल्या रविवारला चकमक उडाली. पोलिसांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला. पोलिसांचा वाढता दबाव पाहून माओवादी जंगलाचा फायदा घेऊन पसार झाले. त्यानंतर पुन्हा त्याच जंगलात रात्री साडेआठच्या दरम्यान पोलिस आणि माओवाद्यांत चकमक उडाली.यात सीआरपीएफ ११३ बटालियनचे हवालदार मंजुनाथ शिवलिंगप्पा (३१) हा जवान शहीद झाला.या सर्वगोष्टीकंडे बघितल्यावर असे दिसून येते की माओवादी जे शांत बसले होते.त्यांनी डिसेंबर महिन्याच्या त्यांच्या सप्ताहापुर्वीच मोठाघातपात घडवून आदिवासी जनतेत दहशत निर्माण करण्यासाठी आखलेल्या व्यवुरचनेत कुठेतरी पोलिसांची यंत्रणा त्यांची व्युवरचना भेदण्यात चुकते की काय असे वाटू लागले आहे.
नेहमी अहेरी-सिरोंचापरिसरात आपले अस्तित्व दाखविणाèया माओवाद्यांनी यावेळी वेगळी रणनिती आखत जवानांना लक्ष्य करण्यासाठी अ‍ॅम्ब्युश लावला तो सुध्दा कोरची कुरखेडाच्या जंगलपरिसरात.त्यातच येत्या २ डिसेंबरपासून माओवाद्यांचा पीपल्स गुरिल्ला आर्मी सप्ताहाला सुरवात होत असल्याने गोंदिया-गडचिरोली-बालाघाट व राजनांदगावच्या सिमेवर पोलिसांचे कोंबीग ऑपरेशन सुरु झालेले आहे.त्या पाश्र्वभूमीवर माओवाद्यांकडून घातपात घडविण्याचा प्रयत्न होत आहे.रविवारच्या घटनेत कंपनी ४, टिपागड दलमसह केकेडी (कुरखेडा-कोरची-देवरी दलम)चे माओवादी सहभागी झाल्याचा अंदाज आहे.कंपनी चारचा कमांडर असलेला आणि दंडकारण्य झोनल समितीचा सदस्य असलेल्या गिरीधर या वरिष्ठ माओवादी नेत्याच्या उपस्थितीची या घातपाताच्यावेळी असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
कोरची तालुक्यातील ग्यारापत्ती उपपोलिस ठाण्याचा भाग छत्तीसगडच्या राजनांदगाव आणि कांकेर जिल्ह्याला लागून आहे. या भागात घनदाट जंगल आणि टिपागडचे डोंगर असल्याने माओवाद्यांसाठी अनुकूल मानला जातो. कंपनी चारसह टिपागड दलम, केकेडी या नावाने तीन वर्षापूर्वी अस्तित्वात आलेल्या कुरखेडा-कोरची-देवरी दलमच्या हालचाली या भागात आहेत.
या भागात माओवाद्यांच्या हालचालीची माहिती मिळाल्याने ग्यारापत्ती पोलिस ठाण्यातून ४० पोलिसांसह २० केंद्रीय राखीव दलाचे जवान रविवारी दुपारी अभियानावर बाहेर पडले होते. टिपागड डोंगरालगत असलेले टवेगाव पार केल्यानंतर माओवाद्यांना घेरण्याच्या रणनितीने पोलिसांचे पथक पूर्वेकडून पश्चिमेच्या दिशेने डोंगरावर गेले. दुसरीकडे डोंगराच्या खालच्या बाजूला केंद्रीय राखीव दलाचे जवान होते. डोंगराच्या वरच्या बाजूला असलेल्या पोलिसांसोबत माओवाद्यांची चकमक झाली. अध्र्या तासाच्या चकमकीत जवानांचा दबाव वाढू लागल्याने माओवाद्यांनी माघार घेतली. तोपर्यंत अंधार झाला होता. दुसरीकडे डोंगराच्या खाली नाल्याजवळ असलेल्या केंद्रीय राखीव दलाचे जवान पुढे डोंगरावर जाण्याच्या प्रयत्नात होते. मात्र माओवाद्यांनी सीआरपीएफ जवानांच्या दिशेने गोळीबार सुरू केला. त्याला जवानांनी प्रत्युत्तर दिले. यात सीआरपीएफच्या तुकडीचे पायलट मंजुनाथ यांना गोळी लागून शहीद झाले. तर दोन जवान जखमी झाले.
माओवाद्यांसोबत झालेल्या चकमकीची दोन्ही पथके वायरलेसवर एकमेकांना माहिती देत होते. मात्र रात्रीच्या १० वाजताच्या सुमारास माओवाद्यांच्या अ‍ॅम्ब्युशमध्ये फसल्याची जाणीव जवानांना झाली.आणि वायरलेस आणि सॅटेलाइट फोनवरून पोलिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्याशी संपर्क साधून माहीती दिली. त्यांनी सी-सिक्स्टी कमांडोंची चार पथके आणि सीआरपीएफचे विशेष पथक या भागात रात्री १२ वाजतानंतर रवाना केले.