कल्लेडच्या जंगलात आढळला आणखी एका नक्षल्याचा मृतदेह

0
10

गडचिरोली, दि.१२: सिरोंचा तालुक्यातील झिंगानूर उपपोलिस ठाण्यांतर्गत कल्लेड येथील जंगलात झालेल्या चकमकीत पोलिसांच्या सी-६० पथकाच्या जवानांनी ७ नक्षल्यांचा खात्मा केला होता. दरम्यान, पोलिसांच्या नक्षलविरोधी अभियानादरम्यान आज त्याठिकाणी पुन्हा एका पुरुष नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला आहे. यामुळे कल्लेड जंगलातील चकमकीत मृत नक्षल्यांचा आकडा ८ वर पोहचला आहे. ६ डिसेंबरच्या सकाळी कल्लेड जंगलात पोलिसांच्या सी-६० पथकाशी झालेल्या चकमकीत ५ महिला व २ पुरुष नक्षली ठार झाले होते. या घटनेनंतरही पोलिसांनी त्या भागात नक्षलविरोधी अभियान राबविणे सुरुच ठेवले होते. दरम्यान आज सकाळी एका नक्षलवाद्याचा मृतदेह आढळून आला. यावरुन कल्लेडच्या चकमकीत आणखी काही नक्षलवादी ठार किंवा गंभीर जखमी झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.