CRPF वर हल्ला करणारा दहशतवादी दहावीतील विद्यार्थी, वडील जम्मूत पोलीस!

0
14

श्रीनगरदि.०१ः – दक्षिण काश्मिरच्या पुलवामा जिल्ह्यात लेथपोरा येथे असलेल्या केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळात घुसून,दहशतवाद्यानी  केलेल्या आत्मघाती हल्यात 5 जवान शहीद झाले, तर आणखी 3 जण जखमी झाले. नंतर सुरक्षा दलांनी कित्येक तास केलेल्या जबाबी कारवाईत हल्ला करणारे दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.दरम्यान, या हल्ल्यामागे स्थानिक तरुणांचा समावेश असल्याची माहिती समोर आली आहे.  या आत्मघातकी हल्ल्यातील दोन दहशतवाद्यांपैकी एक जण अवघ्या 16 वर्षांचा होता.

मिळालेल्या माहितीनुसार, त्राल येथे राहणारा 16 वर्षीय दहशतवादी फरदीन अहमद खांदे हा दहावीचा विद्यार्थी होता. विशेष म्हणजे फरदीनचे वडील जम्मू-काश्मीर पोलिसांत कॉन्स्टेबल म्हणून कार्यरत आहेत.हा आत्मघाती हल्ला रविवारी पहाटे 2 वाजण्याच्या सुमारास झाला. ‘सीअरपीएफ’ आणि पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, आधीपासून आसपासच्या झुडपांमध्ये लपून बसलेले शस्त्रसज्ज अतिरेकी या तळात घुसले. प्रवेशद्वारावर पहारा देणा-या सशस्त्र जवानाने त्यांना हटकले, परंतु रॉकेट लॉन्चर व मशिनगन घेऊन आलेल्या या अतिरेक्यांनी हातबॉम्ब फेकत आत प्रवेश मिळविला.

सूत्रांनुसार, तळावरील निवासी इमारतीमध्ये गाढ झोपेत असलेले जवान या गडबडीने जागे झाले व अनेक जण बाहेर आले. अंदाधुंद गोळीबार करत, आत शिरलेल्या अतिरेक्यांच्या गोळ््यांनी यापैकी एक जवान जागीच ठार झाला. जखमींपैकी आणखी ३ जवानांना इस्पितळात उपचार सुरू असताना वीरमरण आले, तर एक जवान इसिपतळात नेत असतानाच हृदयविकाराच्या झटक्याने दगावला.