23.7 C
Gondiā
Tuesday, July 21, 2026
Home Top News शेअर बाजाराची विक्रमी उसळी, सेन्सेक्सने ओलांडली 35,000 पातळी

शेअर बाजाराची विक्रमी उसळी, सेन्सेक्सने ओलांडली 35,000 पातळी

0
21

मुंबई,दि.17(वृत्तसंस्था) – शेअर बाजाराने बुधवारी विक्रमी पातळी गाठण्यात यश मिळवले. मुंबई शेअर बाजार निर्देशांक म्हणजेच सेन्सेक्सने प्रथमच 35000 ची पातळी ओलांडली. दुपारी शेअर खरेदीला मिळालेल्या प्रतिसादामुळे सकारात्मक संकेत पाहायला मिळाले. 231.73 अंकांनी उसळी घेत दुपारी सेन्सेक्स 35002.78 वर पोहोचला. 26 डिसेंबर रोजी सेन्सेक्सने 34000 ची पातळी गाठली होती. त्यानंतर 17 सत्रांमध्ये सेन्सेक्सने 35000 ची पातळी गाठली आहे. बँकिंग आणि आयटी क्षेत्रासह एफएमजीसी (FMGC) यांचे शेअर वधारल्याने शेअर बाजाराने ही विक्रमी पातळी गाठली आहे.

blank