जिल्हा परिषद शाळा बंद हाेणार नाहीत; ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे

0
13

बीड,दि.२२: – एक किलाेमीटरच्या अंतरात दुसरी शाळा नसेल तर या भागातील जिल्हा परिषदेची शाळा बंद हाेणार नाही. कोकणात एका गावात एक किलाेमीटर अंतरावर शाळाच नाही. परंतु, सध्या त्या शाळेत तीनच विद्यार्थी अाहेत. तरीही ती शाळा सुरू अाहे. शाळा बंद करण्याचे सरकारचे धाेरण नाही. मात्र, विद्यार्थी संख्येनुसार शाळांच्या खर्चाचे नियाेजन सरकार करत अाहे, अशी माहिती ग्रामविकास मंत्री पंकजा मुंडे यांनी ८व्या मराठवाडा लेखिका साहित्य संमेलनाच्या समाराेपात रविवारी दिली.संमेलनाच्या दुसऱ्या दिवशी प्रकट मुलाखती, परिसंवादांनंतर नऊ ठराव पारित करण्यात आले. व्यासपीठावर संमेलनाध्यक्षा डाॅ. दीपा क्षीरसागर, स्वागताध्यक्षा उषा दराडे, मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष प्राचार्य कौतिकराव ठाले पाटील, कोशाध्यक्ष डॉ. भास्कर बडे, बीड शाखेचे प्रमुख डॉ. सतीश साळुंके, दादा गाेरे, प्रा. सुशीला माेराळे, जि. प. अध्यक्षा सविता गाेल्हार, संताेेष हंगे, भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पाेकळे, नामदेव क्षीरसागर यांची प्रमुख उपस्थिती हाेती.