बालाघाट-राजनांदगावच्या सीमेवर पोलीस नक्षल चकमकीत 2 नक्षली ठार

0
13
file photo

गोंदिया,(खेमेंद्र कटरे) दि.09ः मध्यप्रदेशातील बालाघाट व छत्तीसगढ़मधील राजनांदगांव जिल्ह्यातील लक्षणाटोला व गोलाच्या जंगलात आज पोलिस आणि नक्षलवादयात झालेल्या चकमकीत 2 नक्षली ठार झाले असून त्यांचे मृतदेह ताब्यात घेण्यात आले आहेत.हा भाग गोंदिया जिल्ह्याला लागून आहे. ठार झालेल्यांमधे डेप्युटी कमांडर विनोद(गडचिरोली निवासी) आणि सदस्य सागर( निवासी दक्षिण बस्तर) यांचा समावेश आहे.

मध्यप्रदेशातील बालाघाट जिल्ह्यातील सीमावर्ती भागात अस्थायी कॅम्प असलेल्या मलायदा येथील पोलीस फोर्सला(हाॅकफोर्स),राजनादगांव येथील ई-30,व आईटीबीपीच्या चमू या 6 फेबुवारीला सर्चिंगकरीता रवाना झाल्या होत्या.सर्चिंगदरम्यान त्यांना याभागात नक्षली असल्याची माहिती मिळाली असता त्यांना शोधमोहीम अधिक तीव्र केली.ही मोहीम राबवित असाताना आज 9 फेबुवारीला सकाळी 9 वाजेच्या सुमारास हाॅकफोर्स,ई-30 व आईटीबीपीच्या संयुक्त मोहीमेत नक्षल्यांच्या प्लाटून नं.55 चा डिप्टी कमांडर विनोद व सदस्य सागर यांच्यात चकमक झाली.या चकमकीत हे दोन्ही नक्षली ठार झाले.त्यांच्याकडून व घटनास्थळावरून 12 बोर बंदूक ,01 पिस्टल हस्तगत करण्यात आले आहे.या अभिनायात  मलायदा येथे तैनात हाॅक फोर्स चे 30, ई-30 चे 30 व आईटीबीपी चे 50 सदस्यांनी सहभागी घेतला होता. राजनादांगाव व बालाघाट  जिल्ह्यातील सीमावर्ती भागात सध्या शोधमोहीम सुरु असून सीमावर्ती भागात अर्लट जाहिर करण्यात आला आहे.डिप्टी कमाण्डर विनोद वर छत्तीसगढ़ शासन द्वारा 08 लाख रूपये व मध्यप्रदेश शासन द्वारा 01 लाख रूपये आणि महाराष्ट्र राज्य द्वारा 03 लाख रूपयाचा पुरस्कार जाहिर करण्यात आला होता.सदस्य सागर वर छत्तीसगढ़ शासन द्वारा 02 लाख रूपये व मध्यप्रदेश शासन द्वारा 50 हजार रूपये आणि महाराष्ट्र सरकारद्वारा 2.50 लाख रूपये पुरस्कार जाहिर करण्यात आले होते.