आधी सत्ता सोडण्याचे धाडस दाखवा, आशिष शेलार यांचे उद्धव ठाकरेंना प्रत्युत्तर

0
16
वाढदिवसाच्या शुभेच्छा

मुंबई–पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्त्व मान्य नसेल आणि त्यांच्यावर टीका करायची असेल, तर आधी सत्ता सोडण्याचे धाडस दाखवा, मग टीका करा, असे प्रत्युत्तर भाजप आमदार आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरेंना दिले.दिल्लीतील भाजपच्या दारूण पराभवानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केजरीवाल यांचे अभिनंदन करत लाटेपेक्षा त्सुनामी मोठी असते, हे दिल्लीतील निकालांनी दाखवून दिल्याचा खोचक टोला भाजपला लगावला. याच्या प्रत्युत्तरात आशिष शेलार म्हणाले, “मोदी हे राष्ट्रीय नेते आहेत. त्यामुळे दिल्लीतील पराभवासाठी मोदींना जबाबदार धरता येणार नाही. मोदींवर टीका करण्याआधी त्यांनी सत्ता सोडण्याचे धाडस दाखवावे त्यानंतर टीका करावी.”