26.9 C
Gondiā
Friday, August 21, 2026
Home Top News खाबऱ्या असल्याच्या संशयाने पोलीस पाटलाची केली नक्षलांनी हत्या

खाबऱ्या असल्याच्या संशयाने पोलीस पाटलाची केली नक्षलांनी हत्या

0
33

गडचिरोली,दि.22 :- एटापल्ली तालुक्यापासून १४ कि.मी. अंतरावर असलेल्या लांजी येथील पोलीस पाटील कटिया पेक्का कुमोटी वय ५५ वर्ष हा काल रात्री शेतात रखवाली करिता गेला होता.  त्यावेळेस त्यांच्या सोबत लहान मुलगा, सुन, पत्नी आणि ते स्वतःह शेतात रखवालीसाठी गेले असता रात्री अंदाजे १० ते ११ दरम्यान नक्षलवादी येऊन पोलीस पाटील कटिया पेक्का कुमोटी यांना घेऊन जात असता पत्नीने त्यांना विचारले कि, तुम्ही माझ्या नवऱ्याला का बर नेत आहात. त्यांनी काही एक न सांगता त्यांना जंगलात घेऊन गेले. त्यानंतर आज सकाळी गावाच्या बाहेर त्याचे मृतदेह आढळून आले. दगडाने डोक्यावर मारले व गळा कापलेला मृतदेह आढळला. काही कालावधीपूर्वी ताडपल्ली येथे नक्षल व पोलीस चकमकीत एक नक्षल मारल्या गेला होता. पोलीस पाटील खबऱ्या असल्याचे नक्षलांच्या संशयावरून या पोलीस पाटलाची हत्या झाल्याची शंका व्यक्त करण्यात येत आहे. त्याच्यामागे पत्नी, ४ मुले, २ मुली असा मोठा परिवार आहे. त्याच्या खिशात नक्षलांनी लिहिलेली एक चिठी मिळाली आहे. त्यामध्ये हा पोलीसांचा खबऱ्या होता त्यामुळे हत्या करण्यात आल्याचा त्यात उल्लेख आहे.