बंगळुरु-एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेसला अपघात; पाच प्रवाशांचा मृत्यू, अनेक जखमी

0
11

होसूर- बंगळुरु-एर्नाकुलम इंटरसिटी एक्स्प्रेसला आज (शुक्रवारी) सकाळी पावणे आठ वाजेच्या सुमारास अपघात झाला. एक्स्प्रेसचे सहा डबे रुळावरुन घसरले असून या अपघातात पाच प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. तसेच 27 प्रवाशी जखमी झाल्याची माहिती मिळाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुलागोंडापाल्ली आणि चंद्रपुरममधील एनेकल रेल्वे स्टेशनजवळ हा अपघात झाला. बंगळुरूहून ही एक्स्प्रेस सकाळी 6 वाजून 30 मिनिटांनी एर्नाकुलमकडे निघाली होती. दोन एसी-चेअरकार आणि दो-नॉन एसी चेअरकारचे मोठे नुकसान झाले आहे. एक्सिडेंट रिलीफ ट्रेन घटनास्थळाकडे रवाना झाल्याची माहिती रेल्वेचे प्रवक्ता अनिल सक्सेना यांनी दिली आहे. तामिळनाडूमधून सात तर कर्नाटकतून दहा अॅम्ब्युलन्स घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. जखमींवर स्थानिक रुग्णालयात उपचार सुरु आहेत. मदतकार्य युद्धपातळीवर सुरु आहे.

रेल्वेचे हेल्पलाइन क्रमांक : 09731666751 आणि 080 22371166