लाल वादळ मुंबईत धडकले, 30 हजार शेतकरी आझाद मैदानात

0
9

मुंबई,दि.12-नाशिक ते मुंबई असे 180 किमीचे अंतर पायी कापत मुंबईत पोहोचलेल्या शेतकरी मोर्चाची अखेर राज्य सरकारने दखल घेतली. जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी रविवारी शेतकरी नेत्यांशी चर्चा केली असून सोमवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर बैठक होत आहे. सरकारने लेखी आश्वासन दिल्यास व त्याची पूर्तता हाेईपर्यंत आंदोलन सुरू ठेवले जाईल. मात्र सर्व अटी मान्य केल्यास आंदोलन मागे घेऊ, असा पवित्रा शेतकरी नेत्यांनी घेतला. जलसंपदा मंत्री चर्चेसाठी येतात, मात्र कृषिमंत्री पांडुरंग फुंडकर आले नाहीत, याबद्दल शेतकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. दरम्यान, युवा सेनेचे प्रमुख अादित्य ठाकरे यांनीही या शेतकऱ्यांना पाठिंबा िदला.

नाशिकहून मुंबईला निघालेला मोर्चाने रविवारी रात्री 12-1 वाजता दरम्यानच मुंबईकडे कुच केले. सोमवारी सकाळी मोर्चा मुंबईकडे निघाला असता तर मुंबईत थांबली असती. सर्व रस्ते जाम झाले असते याचा विचार करुन आणि 10वी, 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा असल्याचे लक्षात घेऊन मोर्चाचे प्रमुख अजित नवले यांनी रात्रीतूनच मुंबईत पोहोचण्याचा निर्णय घेतला. विद्यार्थी आणि मुंबईकरांची मोर्चेकऱ्यांनी काळजी घेतली आहे. यासाठी त्यांचे आभार व्यक्त करण्यासाठी मंत्री गिरीश महाजन रात्रीच मोर्चेकऱ्यांच्या भेटीला गेले.