महिला दिनी आरोग्य परिचारिकांचा सन्मान

0
16

गोंदिया,दि.12 – जागतिक महिला दिनानिमित्त गोंदियाच्या जेसीआय राइस सिटीतर्फे स्थानिक बाई गंगाबाई स्त्री रुग्णालयातील आरोग्य परिचारिकांचा सन्मान करण्यात आला.
जगात अनेक व्यक्ती ह्या सामाजिक कार्य करीत असतात. त्यापैकी अनेक जण हे जगाच्या दृष्टीपटलावर सुद्धा येत नाही. अशा व्यक्तिमत्वांना शोधून त्यांचा सन्मान करण्याचे कार्य जेसीआयच्या माध्यमातून केले जाते. अशाच काही महिलांच्या कार्याची दखल घेत जागतिक महिला दिनानिमित्त ङ्कसॅल्यूट टू सायलेंट वर्करङ्क हा कार्यक्रम बाई गंगाबाई रुग्णालयात घेण्यात आला. यामध्ये रुग्णालयात कार्यरत आरोग्य परिचारिकांचा सन्मान जेसीआय गोंदिया राइस सिटीने केला. दीपशिखा साडबे, शीला तमखाने, शिल्पा देशमुख, सुनीता सोनवाने, साधना शेरकुरे, माधुरी लाड, रीना तुरकर, दीपिका गजभिये, नमिता महारवाडे, कीर्ती पटेल, इत्यादी आरोग्य परिचारिकांचा सन्मान चिन्ह देऊन यावेळी सत्कार करण्यात आला. दरम्यान, जेसीआई गोंदिया राइस सिटीचे २०१८ चे अध्यक्ष शैलेंद्र कावळे,माजी अध्यक्ष रवी सपाटे, सौरभ जैन, स्वाती चव्हाण,मधुलिका नागपुरे,डॉ. अमरिश मोहबे, डॉ. कांबळे, समाज सेविका कृपाल, सविता बेदरकर, डॉ. सुवर्णा हुबेकर, दिव्या भगत , इंजि. शालू डोंगरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते. आणि इत्यादी उपस्थित होते .