छत्ताबलमध्ये जवानांचा दहशतवाद्यांना घेराव, चकमकीत एक जवान जखमी

0
7

श्रीनगर,दि.5(वृत्तसंस्था) -जम्मू काश्मीरमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.शनिवारी (5 मे)सकाळी श्रीनगरच्या छत्ताबल येथे दहशतवाद्यांकडून जवानांवर गोळीबार करण्यात आला. त्यांच्या या हल्ल्यास जवानांनी चोख प्रत्युत्तरदेखील दिले. दरम्यान, ज्या परिसरात दहशतवादी लपून बसले आहेत, त्यास जवानांनी चहुबाजूंनी घेराव घातला आहे. सध्या जवान आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक सुरू आहे.छत्ताबल परिसरात दहशतवादी असल्याची माहिती मिळाल्यानंतर जवानांनी परिसरास घेराव घालत शोधमोहीम सुरू केली. दरम्यान, या चकमकीत सीआरपीएफचा एक जवान जखमी झाल्याची माहिती समोर आली आहे.