25.1 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home शैक्षणिक कवलेवाडा जीईएसमध्ये विद्यार्थी,पालकशिक्षक सभा

कवलेवाडा जीईएसमध्ये विद्यार्थी,पालकशिक्षक सभा

0
42
गोरेगाव,दि.04ः-तालुक्यातील कवलेवाडा येथील जी. इ.एस. हाय‌स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयात विद्यार्थी,पालक व शिक्षकांच्या संयुक्त सभेचे आयोजन प्राचार्य डी.एम.वासनिक यांच्या अध्यक्षतेखाली तर शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष श्रीप्रकाश रहांगडाले व पोलीस पाटील राहुल बोरकर यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली.याप्रसंगी प्राचार्य डी.एम.वासनिक यांनी शाळेच्या सर्वांगीण विकासासाठी तीन्ही घटक अतिशय महत्त्वाची भुमिका कसे पार पाडतात यावर आपले समायोचित मत मांडले.आणि नविन सत्रात विद्यार्थी प्रगती करिता विविध उपक्रम राबविले जातील असे मत व्यक्त केले.श्रीप्रकाश रहांगडाले यांनी शाळेच्या प्रगती बाबत समाधान व्यक्त केले.कार्यक्रमाची सुरुवात स्व.मनोहरभाई पटेल यांच्या फोटोला हार अर्पण व दिप प्रज्वलन करून करण्यात आली.प्रास्ताविक व संचालन शारीरिक शिक्षक साबीर पठान व आभार प्रदर्शन कु.नीता जाधव यांनी मानले.