पाच जहाल माओवाद्यांचे आत्मसमर्पण

0
16

गडचिरोली,दि.03(अशोक दुर्गम): सरकारच्या आत्मसमर्पण योजनेतंर्गत २० लाख रुपये बक्षिस असलेल्या ५ जहाल माओवाद्यांनी पोलीस अधिक्षक शैलेश बलकवडे ,अपर पोलीस अधिक्षक महेंद्र पंडित,अपर पोलीस अधिक्षक हरी बालाजी यांच्या समोर आज आत्मसमर्पण  केले आहे.यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील माओवादी चळवळीला जबर हादरा बसला आहे. गडचिरोली पोलीसांनी माओवांदयाच्या विरोधात आतापर्यंत केलेली उत्कृष्ट कामगिरी तसेच विकासाच्या विविध योजना राबवुन जनतेचा विश्वास संपादन  केल्यामुळे माओवादी मोठ्या प्रमाणात आत्मसमर्पण करु लागले आहेत. आत्मसमर्पित माओवाद्यांपैकी २ महीला व ३ पुरुष असुन साईनाथ व दिना हे दोघे पती पत्नी आहेत.
अात्मसमर्पण केलेल्यामध्ये साईनाथ ऊर्फ सत्त् चक्कु पोदाळी(वय २६) याचा समावेश असून आक्टोबर २००९ ला कसनसुर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन तो प्लाटुन क्र. ३ तसेच गट्टा दलम सदस्य म्हणून कार्यरत होता. त्याचा एकुण ०६ पोलीस नक्षल चकमकीत सहभाग होता. तसेच त्याचेवर ०२ जाळपोळीचे गुन्हे आहेत.त्याचावर २ लाखाचे बक्षिस  होते.
दिना ऊर्फ सन्नी मंगल पॅगाटी(वय २०)ही नोव्हेंबर २०१४ ला जागुरगुडा (छ..)दलम मध्ये भरती होऊन भामरागड दलम, गट्टा दलम मध्ये सदस्य म्हणून कार्यरत होती. तिचा एका पोलीस नक्षल चकमकीत सहभाग होता. तसेच तिचेवर ०१ जाळपोळीचा गुन्हा दाखल आहे.तिचेवर रुपये २ लाख बक्षिस होते.
सुशिला ऊर्फ शिला ऊर्फ ज्योती ऊर्फ मदनी लक्ष्मण. तलांडी (वय २८)जुन २००१ ला पेरमीली दलम मध्ये भरती होऊन २००३ मध्ये तिची बदली डिवीजन सि.एन.एम. टिममध्ये होवून त्यानंतर कपंनी क्र. १०, अहेरी एरीया सि.एन.एम. टिम, प्लाटुन क्र. १४ आणि २०१२ पासुन इंद्रावती एल.ओ.एस. (छ.ग.) मध्ये ए.सि.एम. पदावर कार्यरत होती. तिच्यावर १० पोलीस नक्षल चकमकीत सहभाग असल्याचेतसेच  ७ खुन व १ जाळपोळीचा गुन्हा दाखल आहे. तिचेवर ६ लाख रुपयाचे बक्षिस होते.
राजेश ऊर्फ राज याकब कुज़र(वय ३६) डिसेंबर २००६ ला कसनसुर दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन त्यानंतर कंपनी ४ मध्ये पीपीसीएम पदावर बढती होवून २०१० मध्ये दक्षीण डिवीजन डॉक्टर टिममध्ये बदली होवून सन २०११ पासुन कंपनी क्र. १० मध्ये पिपीसीएम पदावर कार्यरत होता. हा १९ पोलीस नक्षल चकमकीत सहभाग होता. तसेच त्याचेवर ०२ खुन , ०१ जाळपोळ केल्याचे गुन्हे दाखल आहेत. शासनाने ६ लाखाचे बक्षिस जाहीर केले होते.
तर  मंगेश ऊर्फ विजय बाज गावडे(वय ३२) नोव्हेंबर २००९ ला पेरमीली दलममध्ये सदस्य पदावर भरती होऊन २०१० पासुन प्लाटुन क्र. १४ मध्ये पीपीसीएम पदावर कार्यरत होता. त्याचा एकुण १० पोलीस नक्षल चकमकीत सहभाग होता.त्याचेवर ०७ खुन , ०२ जाळपोळ केल्याचे गुन्हे दाखल असून ४ लाखाचे बक्षिस होते.