24.4 C
Gondiā
Friday, August 14, 2026
Home Top News माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन

माजी केंद्रीय अर्थराज्यमंत्री शांताराम पोटदुखे यांचे निधन

0
27
मागील १० दिवसांपासून त्यांच्यावर नागपूरच्या अरनेजा रुग्णालयात उपचार सुरू होते. पी. व्ही. नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात ते तत्कालीन अर्थराज्यमंत्री म्हणून कार्यरत होते. तसेच मनमोहन सिंग यांचे देखील ते सहकारी होते. चंद्रपूर लोकसभा क्षेत्रातून ते सलग ४ वेळा निवडून आले होते.  अजातशत्रू म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली होती. साहित्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात त्यांचा सक्रिय सहभाग राहिला आहे. चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यातील शैक्षणिक विकासातही त्यांनी भरीव योगदान दिले आहे.त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर उद्या चंद्रपुरात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत.
blank